esakal | बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; पाठ्यक्रमाची यादी होणार संकेतस्थळावर प्रसिद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

hsc exam

बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे अभ्यासक्रम कमी करण्याचे धोरण पुढे सुरू ठेवण्यात आले आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी पुण्याच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेतर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. (25-percent-reduction-in-hsc-cyllabus-marathi-news-jpd93)

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

मार्च २०२० पासून जगात कोरोना महामारी सुरू झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. जूनमध्ये सर्व राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र, आताच्या शैक्षणिक वर्षात नियमित शाळा सुरू झालेल्या नाहीत. परिणामी, वेळेत अभ्यासक्रम सुरू करता आलेला नाही. त्यामुळेच शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

loading image
go to top