इंदिरानगर- पाथर्डी गावातील चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या हनुमान जयंती उत्सवाची सांगता शुक्रवारी (ता. १८) सुमारे अडीचशे मल्लांच्या सहभागाने रंगलेल्या कुस्त्यांच्या दंगलीने झाली. ग्रामस्थांतर्फे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कुस्त्यांच्या दंगलीचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, बाळकृष्ण शिरसाट आदींच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.