उपनगर- गेल्या दीड वर्षापासून रस्त्यांच्या समस्येला नाशिक रोड येथील नागरिक हैराण झालेले असताना महापालिकेला उशिरा उपाययोजना सुचल्या असून, १८ कोटी आणि आठ कोटींचे टेंडर मंजूर झाले आहे. दहा दिवसांत वर्क ऑर्डर निघणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.