अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २७ वर्षांची सक्तमजुरी! येवला न्यायालयाचा निकाल, घटनाजन्य पुरावे आणि १४ सरकारी साक्षीदारांची साक्ष ठरली निर्णायक

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २७ वर्षांची सक्तमजुरी! येवला न्यायालयाचा निकाल, घटनाजन्य पुरावे आणि १४ सरकारी साक्षीदारांची साक्ष ठरली निर्णायक
Published on: 
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; आरोपीला २७ वर्षांची सक्तमजुरी येवला न्यायालयाचा निकाल; पुरावे, १४ साक्षीदारांची साक्ष ठरली निर्णायक सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ४ : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २७ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तांत्रिक विश्लेषण, घटनाजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपी भावड्या ऊर्फ अमोल दिलीप वाघ याने अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पळवून नेले होते. त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण तपासात समोर आले. याशिवाय पीडितेला धमकावणे आणि अपमानित केल्याचे आरोपही आरोपीविरुद्ध होते.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर तीन वर्षांपासून या खटल्याची न्यायालयीन सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले तर आरोपीच्या बाजूने दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, घटनाजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला न्यायालयाने दोषी ठरवत न्यायाधीश श्रीमती के. एफ. खान यांनी निकाल दिला. न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम ४ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड,भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच कलम ५०४,५०६ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सुनील सरोदे आणि ॲड. गणेश बोरसे यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.