Nashik Tourism Project: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ६) त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी २७५ कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा खुला झाला आहे. आराखड्यातील निधीतून भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जातील.