बस मधून सुमारे 3 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Theft
Theftesakal

जुने नाशिक : बसमध्ये प्रवास करत असताना अज्ञात संशयिताकडून पर्समधील सुमारे २ लाख ८७ हजार ७०० रुपये किमतीचे ११.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार वैशाली पवार (६७, रा. पातोंडा अमळनेर) विवाह सोहळ्यानिमित्त शहरातील खोडे नगर येथील मुलाकडे येत होत्या. पातोंडा ते नाशिक बसने त्या द्वारका चौकात आल्या. प्रवासापूर्वी त्यांनी दागिने काढून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून पर्समध्ये ठेवले होते. मुलाच्या घरी पोचताच मुलाकडे दागिने देण्यासाठी पर्स उघडली. त्यात त्यांना दागिने आढळून आले नाही. प्रवासात अज्ञात संशयितांनी दागिने लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठत माहिती दिली.

Theft
लग्न करण्यास गळी पडत असल्याने मेहुणीचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com