नाशिक : जुने वाडे कोसळण्याच्या घटना सुरूच; मंगळवारी 3 वाडे कोसळले

collapsed Pawar Wada at Dingarali Sambhaji Chowk Latest Marathi news
collapsed Pawar Wada at Dingarali Sambhaji Chowk Latest Marathi newsesakal

नाशिक : पावसामुळे (heavy rain) मंगळवारी (ता. १२) ही जुने नाशिकमध्ये वाडे कोसळण्याच्या घटना सुरू होत्या. तीन विविध ठिकाणी वाडे कोसळण्याच्या (Wada Collapsed) घटना घडल्या. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. महापालिका कर्मचाऱ्यांकडून धोकादायक भागांची पाहणी करत काही भाग उतरून घेण्यात आला. (3 old wada collapsed on Tuesday Nashik Latest monsoon Marathi News)

गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने वाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहे. सोमवार (ता. ११) दिवसभरात चार वाडे कोसळले. सोमवारी रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे डिंगरअळी संभाजी चौक परिसरातील पवार वाडा कोसळण्याची घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. वाडा बंद असल्याने कोणीही वास्तव्यास नव्हते.

सुदैवाने जीवित आणि आर्थिक हानी टळली. दरम्यान, चौक मंडई येथील काळेवाडा कोसळण्याची घटनादेखील घडली. वाड्यात लागून असलेल्या अन्य घरांमध्ये रहिवासी वास्तव्यास होते. परंतु, विरुद्ध दिशेने वाडा कोसळल्याने अनर्थ टळला.

collapsed Pawar Wada at Dingarali Sambhaji Chowk Latest Marathi news
NAMCO बँकेला रिझर्व्ह बँकेकडून 50 लाखाचा दंड

रहिवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण होते. सोमवारी सायंकाळी कोसळलेला कुंभकर्ण वाड्याचा आणखी काही धोकादायक भाग मंगळवारी सकाळी कोसळला. तर, आसराची वेस येथील धोकादायक कुलकर्णी वाड्याचा थोडा थोडा भाग कोसळत असल्याने महापालिका पश्चिम विभाग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी वाड्याचा संपूर्ण धोकादायक भाग उतरवून घेतला.

त्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यास मदत झाली. अशाप्रकारे मंगळवारीदेखील वाडे कोसळण्याच्या घटनेत सातत्य दिसले. तरी देखील अन्य धोकादायक काही वाड्यातील रहिवासी मात्र वाडा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन देखील त्यांच्यासमोर कुठेतरी हातभार झाल्याचे दिसून येत आहे.

collapsed Pawar Wada at Dingarali Sambhaji Chowk Latest Marathi news
Nashik Crime : 2 लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com