31st Celebration : तळीरामांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची राहणार करडी नजर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

31st Celebration names

31st Celebration : तळीरामांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची राहणार करडी नजर!

इगतपुरी (जि. नाशिक) : नाताळचे पर्व संपताच लगेच येणाऱ्या थर्टीफस्ट बरोबरच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी येथील मुंबई-आग्रा महामार्गांवरील लहान-मोठया ढाब्यांसह हॉटेल्सवर रोषणाई करण्यात आली आहे.

यावेळी मद्याचा होणारा अतिरेक आणि अपघातांमुळे या उत्साहाला आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. रंगीत व ओल्या पार्ट्या, मद्यपी यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. या पार्ट्यांआडून विनापरवानगी ‘ओल्या पार्ट्या’ होण्याची शक्यता पाहता, ग्रामीण पोलिसही महामार्गांवरील ढाब्यांसह हॉटेल्सवर करडी नजर ठेवून आहेत. (31st Celebration Police will keep watchful eye for drunkards nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News : शहीद जवान जनार्दन ढोमसे अनंतात विलीन; मरळगोई येथे अंत्यसंस्कार

मागील आठवडयातील रविवार (ता.२५) पासून नाताळला प्रारंभ झाला आहे. यासह मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी हॉटेल्ससह विविध हॉटेल्स व महामार्गालगतच्या ढाब्यांवर सुरू झाली आहे. क्लब पार्ट्यांचे वारे नाशिकसह परिसरात पोहोचले आहे.

त्यामुळे अशा पार्ट्या आयोजित करण्यासाठी हॉटेल्स सज्ज होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हॉटेल्सवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. परराज्यातील विनापरवानगी देशी, विदेशी मद्यसाठा मागविला जातो. अशा छुप्यारितीने येणाऱ्या मद्यांवरही पोलिस नजर ठेवून आहेत.

३१ डिसेंबरला हॉटेल्ससह, चौक, घरगुती पद्धतीने होणाऱ्या पार्ट्या, मद्यपी यातून होणारे गैरप्रकार हाणामाऱ्या, महिलांची छेडखाणी असे प्रकार रोखण्यासाठी शहर तसेच ग्रामीण पोलिसांकडुन विविध पथके तयार करण्यात येत आहेत. यासाठी महामार्गावर ‘ड्रंक अ‍ण्ड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीसांनी बोलतांना सांगितले.

हेही वाचा: Viral Lockdown Rumors : सोशल मीडियाला चढला कोरोनाज्वर अन् अफवांनी उडाला गोंधळ!