
Nashik News : सप्तशृंगी गडावर भाविकांची pickup उलटून 32 जखमी
मंगळवारी (ता.२७) : सकाळच्या सुमारास दाभाडी येथील बंडू गांगुर्डे याच्या पीकअपने (MH 18- BZ -8167) दाभाडी येथील २५ ते ३२ भाविक सप्तशृंगीगडावर दर्शन व नवसपूर्तीसाठी जात होते.
नांदुरी ते सप्तशृंगीगड दरम्यान पीकअप सात किमीचा घाट चढून गेल्यानंतर जलशुध्दीकरण केंद्र व दरडोई करवसुली नाक्याच्या अलीकडेच पाचशे मीटरवरील पठारी भागातील एका वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्यावरच पलटी झाली.
वाहनातील भाविक एकमेकांच्या अंगावर पडल्याने एकच आक्रोश सुरू झाला. गडावरील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जखमींना नांदुरी येथे दाखल केले. उर्वरित जखमींना ट्रस्ट व १०८ रुग्णवाहिकेद्वारे वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. (32 injured after pickup of devotees overturns at Saptashrungi Fort nashik news)
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
हेही वाचा: Nashik News : थर्टीफर्स्टसाठी 7 लाख मद्यपींनी घेतले परवाने; नववर्षांसाठी 3 दिवसातील विक्रम
यात प्रताप माळी, दत्तू मोरे, रेणुका पवार, दीपाली पवार, दीपक ठाकरे, अश्विनी ठाकरे, वंदना ठाकरे, निर्मला माळी, पल्लवी ठाकरे, गंगूबाई ठाकरे, केशव निकम, तुषार ठाकरे, सागर गायकवाड, छाया गायकवाड, आकाश गांगुर्डे (सर्व रा. दाभाडी) यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यात सुदैवाने दोन तीन भाविकांचे प्रथमदर्शनी हातापायाचे फॅक्चर वगळता इतर सर्व किरकोळ स्वरुपात जखमी झाल्याने मोठी जिवितहानी टळली. दरम्यान मालवाहू वाहनामध्ये प्रवासी भाविक एवढ्या संख्येने असताना नांदुरी येथे तपासणी न करताच पोलिसांनी वाहन कसे सोडले असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
चीपक मत, टपक जायेगा
अपघातग्रस्त पीकअपच्या मागील बाजूस 'चिपक मत टपक जायेगा' अशा आशयाची ओळ लिहिलेली आहे, मात्र पीकअपमधून प्रवाशी हे पीकअपला चिपकून प्रवास करीत होते. सुदैवाने हा प्रकार घाट सोडून सपाटीभागात झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा: Nashik News : अवघ्या 13 वर्षाच्या ओम ने केली 3800 कि.मी.ची नर्मदा परिक्रमा सायकलवर पूर्ण