Sakal Exclusive : त्र्यंबकमधील भुयारी गटार योजना रामभरोसे; अवघे 10 टक्केच काम!

Excavations in Bhangre Gali.
Excavations in Bhangre Gali.esakal

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : तीर्थक्षेत्री त्र्यंबकेश्‍वरमध्ये (Trimbakeshwar) भाविकांची गर्दी वाढत आहे. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सरकारी योजना राबविण्यात येत आहेत. (34 Crore work approved for underground sewerage scheme in Trimbak Only 10 percent work is being done nashik news)

मात्र दोन ठिकाणांहून पाणी उचलून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना ‘पांढरा हत्ती पोसल्यागत’ झाल्यात. अशातच, शहरातील भुयारी गटार योजनेचे काम रामभरोसे झाले आहे.

८ जून २०२१ ला मंजूर झालेल्या ३४ कोटींच्या कामास सुरवात होऊन अवघे दहा टक्केच काम होत आहे. या कामाची मुदत डिसेंबर २०२३ पर्यंत असल्याने वेळेत काम पूर्ण होणार काय? याचे उत्तर मिळत नाही.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत भुयारी गटारी योजनेस मंजुरी मिळाली. सांडपाणी शहराच्या पश्चिम भागातून म्हणजे पर्वतरांग येथून संपूर्णपणे शहरातील गटारी एकत्र करून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून पुन्हा वापरासाठी उपलब्ध व्हावे, असा उद्देश योजनेचा आहे.

भविष्यातील गरजेनुसार मलप्रक्रिया उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली सांडपाणी प्रक्रिया क्षमता पहिल्या टप्प्यात निर्माण करायची आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग नगरपालिकेची उद्याने, वीटभट्टी, सार्वजनिक व खासगी शौचालये व जवळच्या शेतीसाठी करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Excavations in Bhangre Gali.
Nashik Rain : इगतपुरीत मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह मुसळधार गारांच्या अवकाळीचे तांडव!

पहिल्या कामासाठी दहा कोटी निधी आणि आदिवासी विकास योजनेंतर्गत एक कोटी १३ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. नगरपालिकेचा स्वतःचा हिस्सा असेल. योजनेच्या प्रारंभावेळी अनर्थ झाला. भांगरे गल्लीत २९ एप्रिल २०२२ ला तरुणाला मशिनने चिरडले.

त्यामुळे या भागातील काम बंद आहे. इथले काम सोडून हे मशिन दुसरीकडे काय काम करीत होते, असा प्रश्‍न इथल्या रहिवाशांचा आहे. कामामुळे शहर व शहराबाहेर उत्खनन होणार असल्याने त्रस्त शहरवासीयांची डोकेदुखी वाढणार आहे.

"त्र्यंबकेश्‍वरमधील भुयारी गटार योजनेसंबंधी अनेकांचा विरोध आहे. ही योजना शहरासाठी एक प्रकारे बळजबरीने करण्यासाठी दिली असावी, अशी शहरवासीयांची धारणा झाली आहे म्हणून योजनेस आम्ही विरोध केला असून, ती का रेटून नेण्यात येत आहे, हा खरा प्रश्‍न आहे." - विष्णू दोबाडे (तालुकाध्यक्ष, भाजप)

"भुयारी गटार योजनेत वापरण्यात येणाऱ्या वाहिन्या मोठ्या आकाराच्या हव्या होत्या. कारण शहरातील काही भागातील गटारी मोठ्या आहेत. इथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असते. या गटारीद्वारे शहराबाहेर त्याचा निचरा व्हायला हवा. मात्र आकारमान संकुचित केल्यास शहरात पाणी साचून राहून गंभीर प्रश्‍न तयार होतील. आम्ही मंजुरीसाठी समवेत होतो. परंतु कामातील प्रत्यक्ष बदल व चाललेल्या अनावश्यक गोष्टींनी आता आम्ही कामाच्या विरोधात आहोत." - श्‍याम गंगापूत्र (माजी नगरसेवक)

Excavations in Bhangre Gali.
Export Grapes : नामांकित कंपनीच्या औषधामुळे एक्स्पोर्ट द्राक्ष पिक मातीमोल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com