350th Shivrajyabhishek Din : रायगडावर 6 जूनला 351 ध्वजाची सलामी! नाशिकच्या सिंहगर्जना मंडळाचा उपक्रम

Si
simhagarjana yuva manch
simhagarjana yuva manchesakal

350th Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ६ जूनला रायगड किल्ल्यावर ३५१ ध्वजाची सलामी देण्याचा निर्णय नाशिकच्या सिंहगर्जना युवा मंचने घेतला आहे.

राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी विविध जिल्ह्यांतील मावळ्यांना हे ध्वज स्वत:च्या घरावर लावण्यास सांगितले जाणार आहे. नाशिकचे कीर्तीध्वज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचणार आहेत. (350th Shivrajyabhishek Din 351 flag salute on June 6 at Raigad initiative of Singhagarjana Mandal of Nashik news)

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर होणार असल्याने त्यासाठी राज्यभरातील लाखो मावळे रायगडावर पोचतील. या सोहळ्यासाठी श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती व हेमंत साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभते.

स्वराज्य स्थापण्यासाठी शिवरायांनी दिलेला लढा, गड/किल्ल्याची उभारणी करताना घेतलेले कष्ट याची जाणीव महाराष्ट्रातील जनतेला व्हावी, सिंहगर्जना युवा मंचने हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ध्वजावर शिवरायांनी जिंकलेल्या किंवा बांधलेल्या किल्ल्यांचे नाव असणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

simhagarjana yuva manch
Nashik News: द्राक्षनगरीचे वेगाने होतेय शहरीकरण; चेहरामोहरा बदलतोय, पण सुयोग्य आराखडा हवा

नाशिकचे विश्वविक्रमी पथक म्हणून ओळख असलेली नाशिकची सिंहगर्जना दरवर्षी रायगडावर वादन स्वरूपात शिवराज्याभिषेक दिनी सेवा पुरवते. या वर्षीही ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त साधत ३५१ ध्वजाची सलामी देणार आहेत. सोहळ्यानंतर हेच ध्वज राज्यात ३५१ ठिकाणी वितरित केले जातील.

"युवा पिढीला शिवरायांचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी ३५१ ध्वजाची सलामी देत आहोत. गड, किल्ल्यांचे संवर्धन करायचे असेल तर तरुणांमध्ये जनजागृती व्हायला हवी. त्याशिवाय ऐतिहासिक किल्ल्यांबाबत उदासीनता कमी होणार नाही."

- प्रीतम भामरे, संस्थापक अध्यक्ष, सिंहगर्जना युवा मंच नाशिक

simhagarjana yuva manch
Nashik: पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाडे, घरांना नोटिसा; धोकादायक भाग उतरवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com