Nashik Crime News : चोऱ्या- घरफोड्या जोमात; शहर पोलीस कोमात

burglary News
burglary Newsesakal

नाशिक : शहर परिसरात चोरट्यांनी चार घरफोड्या करीत सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. ऐनसणासुदीमध्ये घरफोड्या होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच, सणासुदीमुळे घरातील साफसफाईचे कामे सुरू असलेल्या संधी साधून अज्ञात चोरटे घरात शिरून ऐवज चोरून नेत आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, शहरभर घरफोडीच्या घटना वाढलेल्या असताना शहर पोलिसांच्या हाती संशयित लागत नसल्याने ते कोमात गेल्याचे बोलले जाऊ लागले आहे. (4 burglaries in closed houses in city Nashik Latest Crime News)

चित्राबाई संजय वराड (रा. गोपाल संकुल, स्वामी विवेकानंद नगर, मखमलाबादगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या बुधवारी (ता.१९) दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या भावाला पाहण्यासाठी गेल्या असता, घराला कुलूप लावले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून कशानेतरी कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातून १० हजार रुपयांची रोकड व ६० हजार रुपयांची दोन तोळ्याची सोन्याची पोत असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार जी.आर. रानडे तपास करीत आहेत.

दुसरी घरफोडी सिडकोतील पाटीलनगरमध्ये घडली. एकनाथ दिगंबर पाटील (रा. पाटीलनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, पाटील भाड्याने राहत असलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावर घरमालक राहतात. गेल्या मंगळवारी (ता.१८) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पहिल्या मजल्यावर जाणारया जिन्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दरवाज्याची कडी उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले असून, कपाटातून मौल्यवान वस्तू चोरून नेले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पावरा हे तपास करीत आहेत.

तिसरी घरफोडी घटना उपनगरला घडली. उमर हनिफ शेख (रा. इंदीरानगर झोपडपट्टी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १५ ते १८ तारखेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व १० हजार रुपयांचा सोनी कंपनीचा टीव्ही असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेले.

burglary News
Free MSRTC Tour : केवळ 52 दिवसातच 1 कोटीहून अधिक ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास!

याप्रकरणी उपनगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार ताजणे हे तपास करीत आहेत. तर चौथ्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी नाशिकरोडला असलेल्या जित मेहेंदी आर्ट दुकानाती २३ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी मोईन अफजल सय्यद याच्या फिर्यादीनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून सोन्याच्या पोती चोरीला

वंदना नंदू सोनवणे (रा. कोणार्कनगर, लोकमंगल सोसायटी, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या राहत्या घरात किचनमध्ये असलेल्या फ्रिजवर ४५ हजार रुपयांची सोन्याची पोत ठेवलेली होती. गेल्या सोमवार (ता.१७) त्यांची सदरील पोत अज्ञात चोरट्याने घरात शिरून चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार ए.सी. बस्ते हे तपास करीत आहेत.

सातूपरमध्येही चोरट्याने ४५ हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. अरुणा दत्ताराव पुंड (रा. सोहम रो हाऊस, मटालेनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.१७) सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे घराच्या दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप उघडून आत प्रवेश केला आणि सोन्याची पोत व सोन्याची अंगठी असा ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

burglary News
Anand Mahotsav 2022 | शास्त्रीय संगीत टिकविण्यासाठी प्रयत्नांची गरज : सचिन चंद्रात्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com