Nashik Electricity Theft: वीजचोरी करणाऱ्यांना महावितरणचा दणका; 15 लाखांची वीजचोरी उघड

Electricity Theft
Electricity Theftesakal

Nashik Electricity Theft : शहरातील वीजचोरी प्रकरणी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिघे व भद्रकालीतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीजचोरी करणाऱ्यांनी १५ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरण वीज कंपनीने दिलेल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे. महावितरणच्या या कारवाईने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (4 cases have been registered by Mahavitaran against thieves stealing electricity nashik news)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी हरेश रामचंद्र भंवर (रा. ठाणे) यांनी याप्रकरणी अंबड पोलीसात तीन तर, भद्रकाली पोलीसात एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जुन्या सिडकोतील शनी मंदिराजवळ राहणारे स्वप्नील रामदास दुसाने (४८) यांनी १ डिसेंबर २०१७ ते २३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान १३ हजार ९५९ युनिट वीजचोरी करून महावितरणची २ लाख ५७ हजार ९५० रुपयांची फसवणूक केली.

याचप्रमाणे, सूरज रमेश कागदे (३२), रमेश रघुनाथ कागदे (६०, दोघे रा. ग्रामोदय शाळेजवळ, सिडको) यांनी १ जुलै २०२० ते २३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ८ हजार ४८५ युनिट वीजचोरी करीत १ लाख ८१ हजार १० रुपयांची फसवणूक केली.

Electricity Theft
Nashik News : विनाहेल्मेट, ट्रिपल सीट वाहनचालक ‘रडार’ वर; 16 लाखांचा ऑनलाइन दंड

तसेच, रमेश रघुनाथ कागदे (६०, रा. सिडको कॉलनी) याने जुलै २०२० ते २३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान १६ हजार ४४५ युनिट वीजचोरी करीत ३ लाख ८३ हजार ८६० रुपयांची वीजचोरी केली.

तर, भाऊलाल पंढरीनाथ तांबडे (५५, रा. स्वस्तिश्री अपार्टमेंट, गोविंदनगर) याने वीजमीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करीत गेल्या ६३ महिन्यांमध्ये ३० हजार ६६५ युनिट विजेची चोरी करीत ७ लाख १० हजार ७१० रुपयांची वीजचोरी केली.

Electricity Theft
Nashik News: महापालिकेचे 3 गोणी कागदपत्र बुनकर बाजारात; मालेगावमध्ये उडाली खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com