नाशिक-देवळा महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे ठार | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

नाशिक-देवळा महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे ठार

देवळा (जि. नाशिक) : येथील देवळा - नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर आज शुक्रवार (ता. १९) रोजी सायंकाळी इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर ता.देवळा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच तर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने रामेश्वर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचुर झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर येथील ढेबुड मळा शिवारातील हिरे कुटुंबातील चौघे जण पिंपळगाव (वा.) येथून मोटारसायकलणे (एमएच ४१ के ५६६१) शेतीच्या कामावरून घराकडे परतत असतांना नाशिककडून आलेल्या इर्टीगा कारने (एमएच ४३ एएल ३००९) त्यांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात या हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे (वय ४२ ), मंगलबाई गोपीनाथ हिरे (वय ३५) या पती-पत्नीसह मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (वय १६) हे जागीच ठार झाले तर जागृती गोपीनाथ हिरे ( वय १८) हिचा मालेगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

loading image
go to top