Nashik Crime: आणखी 4 संशयितांना अटक; सदोष मनुष्यवधासह खुनाचा आरोप, 8 जूनची कसारा घाटातील घटना

Arrest
Arrestesakal

इगतपुरी शहर : सदोष मनुष्यवधासह खुनाच्या आरोपाखाली इगतपुरी पोलिसांनी आणखी चार संशयितांना रविवारी (ता. १५) टक केली. ८ जूनला कसारा घाटात मॉप बिचिंगची घटना घडली होती.

या गुन्ह्यातील फरारी असलेले सूरज रामप्रताप परदेशी (वय २५), गणेश चंद्रकांत राऊत (२३), विकास शर्मा, धनराज परदेशी (रा. गिरजामाता गल्ली, इगतपुरी), अशी संशयितांची नावे असून, त्यांना सोमवारी (ता. १६) न्यायालयात हजर करणार आहे. (4 more suspects arrested Charge of murder with culpable homicide Kasara Ghat incident of June 8 Nashik News)

या गुन्ह्यांत यापूर्वी ६ संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. विहीगाव (ता. शहापूर) येथून ८ जूनला एका पीकअपमधून दोन गायी, बैल व वासरू पडघा येथे पप्पू अतीक पड्डी (वय ३६), अकील गुलाम गंवडी (२५), लुकमान सुलेमान अन्सारी (२५, रा. पडघा, जि. ठाणे) घेऊन जात होते.

कारेगाव येथून त्यांचा पीकअपमध्ये साक्षीदार प्रल्हाद पगारे (रा. विहीगाव) याच्या घरासमोर थांबला होती. कारेगावकडून १ झायलो, २ स्वीफ्ट कार आणि ७ ते ८ दुचाकीवरून १५ ते २० जणांनी पीकअपमधील तिघांना मारहाण केली.

तिघांपैकी अकील गुलाम गंवडी पळून गेला. उरलेल्या दोघांना त्या लोकांनी कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोर आणून रात्री पुन्हा मारहाण केली. लुकमान अन्सारी जीव वाचविण्यासाठी उंटदरीच्या दिशेने पळाला.

Arrest
Nashik Crime News : अवैध वृक्षतोडीवर वनविभागाच्या पथकाकडून जागता पहारा; अनेक वाहने ताब्यात

नंतर टोळक्याने टेम्पो व जखमी अतिक हर्षद पड्डी यांना इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी जखमी चालकाच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी लुकमान अन्सारी बेपत्ता असल्याची तक्रार इगतपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली.

१० जूनला उंटदरीत लुकमान अन्सारी याचा मृतदेह २५० फूट खोल दरीत आढळला. मृतदेह कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे श्‍याम धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच तासांच्या अथक परिश्रमाने रात्री बाहेर काढला होता.

पप्पू पड्डी, अकील गंवडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील काही संशयित फरारी झाले होते. त्यापैकी दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक निरीक्षक सोपान राखोंडे तपास करीत आहेत.

Arrest
Crime News : बिश्नोई गॅंगच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला धमकी; रामनगर पोलिसांनी दोघांना केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com