Dr. Bharati Pawar latest marathi news
Dr. Bharati Pawar latest marathi newsesakal

सिव्हिलमध्ये 100 खाटांच्या क्रिटिकल केअर सेंटरसाठी 40 कोटी

नाशिक : देशातील आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज असणे अतिआवश्यक असल्याने पंतप्रधान आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM Ayushman Bharat Health Infrastructure Mission) अंतर्गत नाशिकसाठी १०० खाटांचे अद्ययावत क्रिटिकल केअर हॉस्पिटल बांधणीसाठी ४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यास राज्यस्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (dr bharati pawar) यांनी दिली. (40 crore for 100 bed critical care center in Civil hospital nashik latest marathi news)

जिल्ह्यातील रुग्णांना सर्वसमावेशक व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यमंत्री डॉ. पवार यांनी पी. एम. अभीम योजनेंतर्गत नाशिक येथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले होते.

यात प्रामुख्याने आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), आयसोलेशन वॉर्ड/ऑक्सिजन सपोर्टेड बेड, सर्जिकल युनिट यांसारख्या सेवांनी सुसज्ज असतील. तसेच दोन लेबर, डिलिव्हरी, रिकव्हरी रूम (एलडीआर) एका नवजात केअर कॉर्नरसह इमेजिंग सुविधा, आहारविषयक सेवा, इत्यादी तसेच एकात्मिक सार्वजनिक आरोग्य लॅब भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य निदान चाचण्या एकाच छताखाली अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहे.

Dr. Bharati Pawar latest marathi news
विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वापर ; बाळासाहेब थोरात

पंतप्रधान आयुष्यमान भारत पायाभूत सुविधा अभियानांतर्गत सक्षम रोग निगराणी प्रणालीचा विस्तार आणि निर्मिती, कोविड- १९ आणि इतर संसर्गजन्य रोगांवरील समर्थन संशोधन प्रदान करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधांची क्षमता व सुसज्जता वाढवण्यासाठी मदत होणार आहे.

संसर्गजन्य रोगांच्या पर्यवसानातून, साथीच्या काळात किंवा आपत्कालीन परिस्थितींसह इतर कोणत्याही परिस्थितीसाठी गंभीर काळजीची गरज असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करणार असल्याचेही राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

Dr. Bharati Pawar latest marathi news
6 महिन्यात सहाशे किलो प्लॅस्टिक जप्त; 9 लाखाचा दंड वसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com