Retirement Honor: 40 वर्षांच्या सेवेचा असाही सन्मान! सेवानिवृत्तीच्या दिवशी शिपाई बसले तहसीलदारांच्या खुर्चीत

Peon sat in Tehsildar chair
Peon sat in Tehsildar chairesakal

Retirement : सेवानिवृत्तीच्या दिवशी तहसील कार्यालयातील शिपाई बाळासाहेब गवारे यांना थेट तहसीलदारांच्या खुर्चीत बसवून त्यांच्या सेवा कार्याचा अनोखा सन्मान सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी केला आहे.

बुधवारी दि 31 सेवापूर्तीचा संपूर्ण दिवस तहसीलदारांच्या दालनात असलेल्या खुर्चीत श्री. गवारे हे बसून होते. तर त्यांच्या बाजूच्या असलेल्या खुर्चीत बसून तहसीलदार श्री. बंगाळे यांनी कामकाज सांभाळले.

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील मूळ रहिवासी असलेले श्री. गवारे सुरुवातीला नांदूर शिंगोटे गावात कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना शिपाई पदावर पदोन्नती मिळाली. तेव्हापासून ते गेली 40 वर्षे सिन्नर तहसील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असून तहसीलदारांच्या दालनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

या दालनाची नियमित स्वच्छता करण्याबरोबरच तहसीलदारांना भेटण्यासाठी येणाऱ्या आगंतुकांचे आदरातिथ्य करण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. तहसीलदारांच्या दालनात सुनावण्या सुरू असतील तर गवारे मामा दरवाजात बसून भेटीसाठी येणाऱ्या त्याबाबत सांगायचे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चाळीस वर्षांच्या सेवेत अनेक तहसीलदारांचा सहवास लाभलेल्या श्री. गवारे यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस सर्वांच्या आठवणीत राहावा यासाठी तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी त्यांचा अनोखा सन्मान केला.

तहसीलदार बसत असलेली खुर्ची श्री. गवारे यांना देऊन त्यांना दिवसभर त्या खुर्चीत बसवण्यात आले व त्यांच्यासमोर असलेल्या बाजूच्या खुर्चीत बसून तहसीलदारांनी संपूर्ण दिवसभराचे कामकाज केले.

दिवसभर तहसीलदारांना भेटायला येणाऱ्यांसाठी हा सुखद धक्का होता. ज्या शिपायाने तहसीलदारांच्या खुर्चीची काळजी वाहिली. त्याच खुर्चीवर त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस सन्मानपूर्वक जावा हे सर्वांसाठी अनपेक्षित होते.

Peon sat in Tehsildar chair
Success Story : अनाथ विद्यार्थी होणार महाराष्ट्र पोलिस; दीपस्तंभच्या मार्गदर्शनाने नियुक्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com