Nashik News : पिंपळचौक पार तोडण्याचा खोडसाळपणा; कारवाईसाठी पोलिस आयुक्तांना निवेदन

Tree Cutting crime
Tree Cutting crimeesakal

नाशिक : भद्रकालीतील पिंपळ चौक येथील चारशे ते पाचशे वर्ष जुने असलेला मुंजोबा व पिंपळपार काही समाजकंटकांनी तोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. (400 to 500 year old Munjoba and Pimpalpar at Pipal Chowk in Bhadrakali were cut down nashik news)

याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून कार्यवाइ करावी असे निवेदन पोलिस आयुक्त व भद्रकाली पोलिस स्टेशनला देण्यात आला आहे.

मनोज परदेशी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जुने मुंजोबा व पिंपळपार हा पिंपळचौक, भद्रकाली येथे असून हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पाराचे नूतनीकरण कामावेळी खडकाळी मशिदीचे नावाखाली काही संबंध नसतांना समाजकंटकांनी वाद केला होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Tree Cutting crime
SAKAL Exclusive : निधी वितरणाच्या आयपास प्रणालीत Server Downचा खो!

तेव्हापासून तेथे पार व भिंत येथील मोकळी जागा ठेवून त्यावर कोणीही काहीही न करता तेथे भराव तसाच ठेवण्यात आला होता. मात्र मंगळवारी (ता १५) दुपारी काहींनी भराव काढून पार तोडण्यास सुरवात करून पाराला इजा पोचविण्याचा प्रयत्न केला.

सदरचे काम परदेशी यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते अंगावर आले. सदरचा प्रकार हा देवस्थानचे परिसरात घडलेला असल्याने या प्रकारामुळे शिवजयंतीचे पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वातावरण गढूळ करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न तसेच कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. तरी याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Tree Cutting crime
Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवात शहरात डीजे वाजणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com