MGNREGA
MGNREGA esakal

MGNREGA Scheme : जिल्ह्यात 41 हजार कुटुंबांना मनरेगाच्या योजनांचा लाभ

MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मोठ्याप्रमाणावर समावेश करण्यात आल्यामुळे नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गत आर्थिक वर्षात जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या ४५ हजार ३७५ कामांपैकी जवळपास ४१ हजार नागरिकांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

यात सर्वाधिक लाभ घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी घेतला असून त्या खालोखाल फळबाग लागवड, गुरांचा गोठा, बांधावरील फळबाग लागवड, सिंचन विहिरी या वैयक्तिक कामांचा समावेश आहे. (41 thousand families benefit from MGNREGA schemes in district nashik news)

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ६७ कामे वैयक्तिक स्वरूपाची व १९७ कामे सार्वजनिक स्वरूपाची असे एकूण २६४ कामे हाती घेण्यात येतात. सदर योजनेतून जिल्ह्यत २०२२-२३ या आर्थिक वर्षात २७.२२ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती करून १०१ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला.

आतापर्यंतचा हा सर्वाधिक खर्च आहे. मागील आर्थिक वर्षात तयार करण्यात आलेल्या रोजगार हमी आराखड्यात ४५ हजार ३७५ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी १६ हजार २६८ कामे पूर्ण झाली असून उर्वरित २९ हजार १०७ कामे प्रगतिपथावर आहेत.

या कामांमध्ये ४१ हजार कामे वैयक्तिक स्वरूपाची आहेत. त्यातील सर्वाधिक २१ हजार ५२७ कामे घरकुल योजनेतील आहेत. घरकूल योजनेतून वैयक्तिक शौचालयाची कामे रोजगार हमी योजनेतून करता येतात.

यामुळे या योजनेमुळे जिल्ह्यातील २१ हजार ५२७ कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे. त्याखालोखाल फळबाग लागवड योजनेचा ८ हजार ९३३ शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

MGNREGA
Water Shortage : एकीकडे अवकाळीने दाणादाण; दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा!

रोजगार हमी योजनेतून गुरांचा गोठा योजनेतून ६ हजार ६७७ पशुपालक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या जवळपास पंधरा योजना राबवल्या गेल्या असून त्यातून ४१ हजार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला असल्याचे दिसत आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना व लाभार्थी संख्या

घरकूल : (२१५७३), फळबाग :( ८९३३), गुरांचा गोठा : (६६७७), बांधावरील फळबाग लागवड (१३३८), सिंचन विहिरी (८००), बांधावरील वृक्षलागवड (७३२), विहीर पुनर्भरण (२६०), वैयक्तिक शौचालय ( २२३), गांडूळ खत ( ९९), नॅडेप खत (५६), तुती लागवड (७२), रेनवॉटर हार्वेस्टिंग (४४), शेततळे (३७).

योजनेतून होतात ही कामे

वैयक्तिक स्वरूपाच्या कामात वैयक्तिक सिंचन विहिरी, गाय गोठे, कुक्कुटपालन शेड, बांधावर फळबाग लागवड, जुनी भात खाचरे दुरुस्ती, शोषखड्डे, वैयक्तिक शौचालय, शेततळे, दगडी बांध, बांधावर वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुती लागवड, विहीर पुनर्भरण, नॅडेप खत, रेशीम लागवड आदी कामांचा समावेश होता.

तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या कामांमध्ये रस्ते तयार करणे, सार्वजनिक शौचालय, पेव्हर ब्लॉक, सिमेंट नाला बांध, भूमिगत गटारी, खेळाचे मैदान, सलग समतल चर इत्यादी कामे हाती घेण्यात येतात.

MGNREGA
MSRTC Bus : धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, पुण्यासाठी नाशिकहून दर अर्धा तासाला सुटणार एसटी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com