Latest Marathi News | Multi Modal Transport Hubचे 42 मजल्याचे टॉवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

Nashik : Multi Modal Transport Hubचे 42 मजल्याचे टॉवर

नाशिक : सिन्नर फाटा लगतच्या स्टेशनवाडीला लागून असलेल्या महापालिकेच्या जागेत सिटीलिंक बससेवेचा डेपो प्रस्तावित असताना आता महारेलची कंपनीची एक रेल्वे लाईन जाणार असल्याने महारेलला अठरा एकर जागा हवी आहे. तर, मेट्रो निओ कंपनीलादेखील ट्रान्स्पोर्ट हबसाठी तीच जागा हवी असल्याने महारेल, निओ मेट्रो, सिटीलिंकचा ४२ मजल्यांचा ‘मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्ट हब’ तयार केला जाणार आहे. (42 floor tower of Multimodal Transport Hub Nashik Latest Marathi News)

नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला स्टेशनवाडी असून, त्या लगत महापालिकेची अकरा एकर जागा आहे. सदर जागेवर महापालिकेकडून बसडेपो उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिटीलिंक कंपनीच्या बसडेपोचे काम सुरू होत असताना महारेल कंपनीने प्रस्तावित पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेची लाईन त्या जागेवरून जाणार असल्याने सदर जागेची मागणी महापालिकेकडे केली.

परंतु, महापालिकेची बससेवादेखील महत्त्वाची असल्याने महारेल, महापालिकेने एकमताने ट्रान्स्पोर्ट हब तयार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दुसरीकडे मेट्रो निओ प्रकल्प येणार असल्याने सिन्नर फाट्यापर्यंत असलेले नियोजन सिन्नर फाट्याच्या पलिकडे नेण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रो निओलादेखील त्या जागेवर महत्त्वाचे स्टेशन उभारायचे आहे. त्यामुळे महारेलची १८ एकर महापालिकेची अकरा एकर या जागेवर मल्टीमोडल हब झाल्यास त्या हबमध्ये मेट्रो निओ कंपनीलादेखील सहभागी करून घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली होती.

या बैठकीसाठी निओ मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, संचालक महेशकुमार, अतिरिक्त महाव्यवस्थापक विकास नाघुलकर, व्यवस्थापक साकेत केळकर, महारेलचे मुख्य सल्लागार अशोक गरुड, नाशिक-पुणे रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक डॅनिश हांडा, अतिरिक्त महाव्यवस्थापक पराग घोलप, राकेश फलारिया, नीलेश खांडगे, नियोजन अधिकारी आदर्श अग्रवाल, रेल्वेचे शाखा अभियंता सुभाषचंद्र शर्मा, हरफुलसिंग यादव, महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता सुनील रौंदळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Nashik : डॉ. श्रीवास, डॉ. सैंदाणे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

सिटीलिंक डेपोची जागा बदलणार

महारेल कंपनीकडून मल्टीमोडल हबसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर, प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. मेट्रो निओ प्रकल्पासाठी महापालिकेचा सहभाग असला तरी तो सहभाग मिळकती उपलब्ध करून देण्यापुरता आहे. महापालिकेकडे निधी नसल्याने जागेसह इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाणार असल्याने महापालिकेच्या हिश्‍श्‍यातच मेट्रो निओच्या हिश्श्याचा सहभाग असेल.

दरम्यान, महारेल कंपनीमार्फत ४२ मजल्यांचा टॉवर उभारला जाणार आहे. परंतु, महापालिका हद्दीमध्ये टॉवर उभारताना ९० मीटरपेक्षा इमारतीची उंची ठेवता येणार नसताना महारेल कंपनी कुठल्या आधारे ४२ मजली टॉवर अर्थात जवळपास १२५ मीटर उंचीचे नियोजन करत आहे. दरम्यान, सिटीलिंकच्या बसडेपोच्या जागेवर निओ मेट्रोने दावा केला आहे. त्यामुळे चेहेडी येथील आरक्षित जागेवर सिटीलिंक कंपनीचा बसडेपो होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: सावधान ! अफवा पसरविल्यास कडक कारवाई

Web Title: 42 Floor Tower Of Multimodal Transport Hub Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..