44 गाव पाणीपुरवठा योजनेचे घोंगडे भिजत; भर पावसात पाण्यासाठी भटकंती

44 village water supply scheme burst water pipe.
44 village water supply scheme burst water pipe.esakal

चांदवड (जि. नाशिक) : तालुक्यातील हरसूल येथे ४४ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटून तीन महिने उलटले तरी अद्याप यंत्रणेची अनास्था व लोकप्रतिनिधींच्या सुस्तावलेपणामुळे रेडगावसह आठ गावातील नागरीकांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (44 village water supply scheme problem water crisis during monsoon in malegaon nashik Latest Marathi News)

जलवाहिनी फुटल्याने घराची कोसळलेली भिंत
जलवाहिनी फुटल्याने घराची कोसळलेली भिंतesakal

हरसूल गावालगत छबू खैरे यांच्या घराजवळ योजनेची जलवाहिनी फुटून जवळपास तीन महिने उलटले आहे. प्रत्येक नागरीकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे हा हक्क आहे. म्हणून केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली. या आठ गावांपैकी पाच गावांना तर महिला सरपंच आहेत.

एक महिला म्हणून त्यांनी तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका मांडायला हवी. जि. प., पं. स. व तालुक्यातील लोकप्रतिनिधीही याप्रश्‍नी गांभीर्याची भूमिका घेत नाही. परिणामी, हरसूल, आहेरखेडे, विटावे, गंगावे, निंबाळे, रेडगाव, साळसाणे, तळेगावरोही येथील नागरीकांना भर पावसाळ्यात तीन महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सर्वत्र पाणीच पाणी असताना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणारी योजना बंद असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. वारंवार बदलणाऱ्या पाण्यामुळे शेकडो कुटुंबांना आरोग्याचा सामना करावा लागत आहे. आमदार, प्रांताधिकाऱ्यानी सरपंच व नागरीकांसोबत बैठक घेऊनही याप्रश्‍नी अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे निरपराध नागरीकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग येणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

44 village water supply scheme burst water pipe.
अंबासनला अवैध गोवंश वाहतूक रोखली; 11 गोवंशाची मुक्तता

घराचे नुकसान; भरपाईची प्रतीक्षाच

एकीकडे पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना जेमतेम पन्नास रुपयांचा खर्च असलेले काम केले जात नाही, हे विशेष. जर खरोखरच पाइपलाइन फुटून खैरे यांच्या घराचे नुकसान झाले असेल तर या योजनेचे दायित्व असणाऱ्या यंत्रणेने त्यांना भरपाई द्यायला हवी. असे असूनही तब्बल तीन महिने हा प्रश्‍न सुटत नसेल तर तालुक्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधी याप्रकरणी असंवेदनशील आहे, असेच म्हणावे लागेल.

"आमच्या घरापासून थोड्या अंरावर या योजनेची पाइपलाइन गेलेली आहे. ती फुटून घराची भिंत पडली. घरात पाणी आल्याने मोठे नुकसान झाले आहे. आम्ही बेघर झालो आहे. यापूर्वी आमच्याकडून पाइपलाइनला धक्का लागला तेव्हा १२ हजार रुपये भरपाई घेतली. तशी आम्हालाही भरपाई मिळावी. "- निलेश खैरे, नुकसानग्रस्त नागरीक, हरसूल

"पाइपलाइन फुटून ज्यांच्या घराचे नुकसान झाले ते भरपाई मागत आहे. परंतु, आमच्याकडे तशी तरतूद नाही. यापूर्वी त्यांच्याकडून घेतलेल्या भरपाईबाबत मला माहिती नाही. लाभार्थी गावांनी पैसे जमा केल्यानंतर पाइपलाइन दुरूस्ती होईल."

- प्रमोद जाधव, शाखा अभियंता, ४४ गाव पाणीपुरवठा योजना

44 village water supply scheme burst water pipe.
‘PWD’च्या जाचाने ठेकेदार ‘बेजार’!; 2 वर्षांपासून देयके थकीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com