Nashik News: सिन्नरच्या पांगरीमध्ये 48 वर्षीय शेतकऱ्याने मानसिक नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

सुसाईड नोटमध्ये बँकांकडून कर्ज वसुलीचा तगादा असल्याचा उल्लेख...
Gorakh Shirsath
Gorakh Shirsathesakal

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील गोरख कचरू शिरसाठ व 48 या शेतकऱ्याने पोल्ट्री फार्म च्या शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

आत्महत्या करण्यापूर्वी शिरसाट यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सिन्नर व्यापारी बँक व बहुउद्देशीय बँक या दोन संस्थांचे कर्ज थकीत असल्याचे म्हटले आहे.

या दोन्ही संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात आल्यामुळे मानसिक नैराश्य येऊन आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख नोट करण्यात आला आहे. (48 year old farmer in Sinnar Pangri end life due to mental depression Nashik News)

पांगरी सुरेगाव रस्त्यावर असलेल्या शेतात गोरख शिरसाट यांचा पोल्ट्री फार्म आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी पोल्ट्री फार्म मध्ये गेल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

पोल्ट्री शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत शिरसाट यांचा मृतदेह आढळून आला. पत्नीने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवण्यात आला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती बावी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस आल्यावर मृतदेहाची तपासणी केली असता शिरसाठ यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळून आली. सिन्नर व्यापारी बँकेचे दीड लाख रुपये कर्ज घेतले होते.

त्यापैकी एक लाख रुपये कर्ज देणे आहे. तर बहुउद्देशीय बँकेचे दोन लाखांचे कर्ज आहे. त्या कर्जापोटी एक लाख वीस हजार रुपये भरावेत म्हणून सारखा तगादा सुरू असल्याचे या नोटमध्ये लिहिण्यात आले आहे.

या दोन्ही संस्थांच्या कर्ज भरावे म्हणून तागादा सुरू होता व त्याचा मानसिक त्रास होत असल्याने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कुटुंबियांना जबाबदार धरू नये असाही उल्लेख करण्यात आला आहे.

Gorakh Shirsath
Mumbai Crime: मुंबईत पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार; एकाचा मृत्यू

वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे हवलदार सतीश बैरागी यांनी घटनास्थळी येत सुसाईड नोट ताब्यात घेतली व स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह जोडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मयत शिरसाट यांच्या मागे

पत्नी, दोन मुले असा परिवार आहे त्यांचा एक मुलगा सिन्नरला खाजगी कंपनीत कामालाजातो, दुसरा घरची पोल्ट्री सांभाळतो.

शिरसाट यांच्यावरील कर्जाचा आकडा 35 लाखांच्या घरात असल्याचे मित्र व नातेवाईकांचे म्हणणे आहे. अवसायनात निघालेल्या सिन्नर व्यापारी बँकेत त्यांचे दोन कर्ज खाते होते. एका कर्जाला आत्माराम पगार यांचा उतारा तारण देण्यात आला आहे.

व्यापारी बँकेकडून घेतलेल्या दोन लाखांच्या एका कर्जाची रक्कम 20 लाख, तर दुसऱ्या एक लाखाच्या कर्जाची रक्कम पंधरा लाख रुपयांवर गेली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून या कर्जाची योग्य पद्धतीने सेटलमेंट व्हावी यासाठी स्वतः शिरसाठ यांचे सह त्यांचे मित्र व नातेवाईक प्रयत्नशील होते.

सुसाईड नोट मध्ये सिन्नर तालुका बहुउद्देशीय संस्था व सिन्नर व्यापारी बँक यांचे थकीत कर्ज असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी त्रास देण्यात येत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

"दुष्काळ व सरकारने सिन्नरच्या शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. सरकारने जाहीर केलेली दुष्काळी तालुक्यांची यादी म्हणजे प्रेम पत्र नाही. जी बघून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल. दुष्काळ संदर्भात ठोस उपाय योजना व्हायला हव्यात. दुष्काळी तालुक्याच्या यादीत सिन्नरचा समावेश आहे. मग त्या ठिकाणी बँका शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा का करत आहेत. बँकेच्या प्रशासकावर शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा."

_ संदीप जगताप (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

"पांगरी येथील शेतकरी गोरख शिरसाट यांच्या आत्महत्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर कळवण्यात आले आहे. कर्जबाजारीपणामुळे सदर आत्महत्या झाली याबाबत महसूल विभागामार्फत तातडीने पडताळणी करण्यात येईल. संबंधित गावचे तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिसांना त्या संदर्भात तपास करण्याची सूचना दिली आहे. "- सुरेंद्र देशमुख (तहसीलदार, सिन्नर)

Gorakh Shirsath
Cyber Crime: ऑनलाईन शेअर मार्केट शिकवण्याचे सांगून ३४ वर्षीय महिलेला घालण्यात आला २४ लाखांना गंडा, वाचा सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com