सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून सुमारे ४८ हजार रुपये किमतीचे २३९ किलोग्रॅम पनीर ताब्यात घेत खाण्यास अयोग्य असल्याने ते नष्ट केले. .गुढीपाडवा, रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार, सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी एफडीएने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील मे. साई एंटरप्रायझेस येथे बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. .यावेळी पथकाने याठिकाणी छापा टाकत येथील पनीर ताब्यात घेत या साठयामधून पनीर या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन तो प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले. तसेच तसेच जप्त करण्यात आलेला संशयित पनीरचा साठा हा नाशवंत असल्याने व तो परत खाण्याच्या उपयोगात येवू नये याकरीता त्यावर नीळ टाकण्यात येवून सदरचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे, सुहास मंडलिक, विनोद धवड, यांच्या उपस्थित आणि महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हीकारवाई झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.