उपनगर- सन २०१५ च्या कुंभमेळ्यात पाच कोटी रुपये खर्चून निर्माण केलेला बस डेपो यंदाच्या कुंभमेळ्यात वापर केला जाणार आहे. देशमुख कुटुंबाच्या जागेत तयार करण्यात आलेला हा बस डेपो बसचे चार्जिंग सेंटर, वॉशिंग सेंटर आणि सर्विस सेंटर म्हणून वापरण्यात येणार आहे. गेल्या कुंभमेळ्यातील ही वास्तु किमान या कुंभमेळ्यात तरी वापरण्यात येत आहे. याचे समाधान परिसरातील नागरिकांसह माजी लोकप्रतिनिधी करीत आहे.