Nashik : 5 महिन्‍यांच्‍या श्रीशाकडे आधारकार्डपासून पासपोर्ट | latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Gupta family with five-month-old baby Srisha

Nashik : 5 महिन्‍यांच्‍या श्रीशाकडे आधारकार्डपासून पासपोर्ट

नाशिक : अवघ्या पाच महिन्‍यांच्‍या चिमुकलीकडे स्‍वतःचे पासपोर्ट, आधारकार्डपासून तर बँक खाते, ई-मेल आयडी तयार आहे. प्रयोगशील असलेल्‍या गुप्ता कुटुंबीयांकडून अभिनव उपक्रम राबविताना श्रीशा या पाच महिन्‍यांच्‍या चिमुकलीसाठी सुकन्‍या योजनेतील खात्‍यासह तिच्‍या सुरक्षित भविष्यासाठी म्‍युच्‍युअल फंडातदेखील गुंतवणूक करण्यात आली आहे. (5 months Srisha gupta had Aadhaar Card Passport sukanya samruddhi account Nashik Latest Marathi News)

यापूर्वीदेखील गुप्ता कुटुंबात जन्‍मलेल्‍या रेशांशसाठी कागदपत्रे व आर्थिक नियोजन करण्यात आले होते. या घरात या वर्षी १२ एप्रिलला जन्‍मलेल्‍या श्रेशासाठीदेखील कुटुंबीयांनी तरतूद केली आहे. त्‍यानुसार श्रीशाची सर्व कागदपत्रे सज्‍ज झाली आहेत.

याशिवाय तिच्‍या उज्‍ज्‍वल भवितव्‍यासाठी आर्थिक तरतूददेखील केली आहे. तिचे वडील सुदर्शन गुप्ता मायनल कंपनीच्या सिन्नर येथील प्रकल्‍पात तंत्रज्ञ प्रशिक्षक आहेत. आई नेहा गुप्ता यांच्‍यासह आजोबा ओमप्रकाश गुप्ता, आजी सरस्‍वती गुप्ता यांच्‍या प्रोत्‍साहनातून अभिनव उपक्रम राबविताना गुप्ता कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा: तुम्ही रस्त्यांवरून फिरत नाही का?; आयुक्तांचा ठेकेदारांना सवाल

हे कागदपत्र, योजना साकारल्‍या

श्रीशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, जन्‍माचा दाखला काढला आहे. याशिवाय एसबीआय, आयसीआयसीआय बँकेत बचत खाते. सुकन्‍या समृद्धी खाते, पीपीएफ खाते, चेक बुक, एटीएम कार्ड, आरोग्‍य विमा (मेडिक्‍लेम), विमा योजना, म्‍युच्‍युअल फंडात गुंतवणूक, एसआयपी या माध्यमातून तिचे भवितव्‍य सुरक्षित केले आहे.

हेही वाचा: घोटीकरांची वणवण; गढूळ पाण्याने ‘फिल्टर प्लांट’च्या अडचणी

Web Title: 5 Months Srisha Gupta Had Aadhaar Card Passport Sukanya Samruddhi Account Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..