धक्कादायक! नाशिकमध्ये चालता बोलता पाच जणांचे मृत्यू | Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

धक्कादायक! नाशिकमध्ये चालता बोलता पाच जणांचे मृत्यू

नाशिक : चालता बोलता बेशुद्ध होऊन अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी (ता.३१) शहरात वेगवेगळ्या भागात बेशुद्ध होऊन पाच जणांचे मृत्यू झाले. बेशुद्ध होऊन श्वास घेण्याच्या त्रासाने पुन्हा मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

आधी बेशुद्ध अन् थेट मृत्यू

पहिल्या घटनेत भगवान श्यामराव पाईकराव (वय ६२, साई वैभव, वृंदावन नगर खुटवडनगर) हे काल सकाळी साडेदहाच्या सुमारास घरात अचानक बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. शिंदे यांनी मृत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत नदीर सिकंदर जमादार (वय ४५, विजयनगर म्हैसाळ सांगली) हे सातपूर येथील डायनॅमिक प्रिस्टेज कंपनीत शुक्रवारी (ता.३१) दुपारी बाराला त्यांच्या गाडीत (एमएच ०९ सीए १७९८) बेशुद्ध स्थितीत आढळले. त्यांना उपचारासाठी कंपनीचे व्यवस्थापक दळवी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. शिंदे यांनी मृत घोषित केले. सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिककर ‘सडन डेथ’ने चिंतित; मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक

तिसऱ्या घटनेत सचिन दादाराव उसरे (वय ३२, सय्यद लॉज भद्रकाली) हे शुक्रवार (ता.३१) सव्वानऊला भद्रकाली भागातील सय्यद लॉजच्या बाथरूममध्ये बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी त्यांचा मित्र विजय पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. शिंदे यांनी मृत घोषित केले. भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चौथ्या घटनेत गंगापूर शिवारातील धर्माजी कॉलनीत हिरामण अप्पाजी गवारे (वय ७३, केवलगार्डन, धर्माजी कॉलनी, गंगापूर शिवार) यांना राहत्या घरी श्वास घेण्यास त्रास होऊन ते बेशुद्ध पडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. भुसारे यांनी मृत घोषित केले.

पाचवी घटना पेठ रोडवरील अश्वमेधनगर येथे उघडकीस आली. घरात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. पेठरोडला अश्वमेधनगरला वाल्मीक निंबा चव्हाण (वय ८०) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांना घरात श्वास घ्यायला त्रास होऊन लागल्याने त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. धूम यांनी मृत घोषित केले. म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक : दोघांचे भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top