Nashik : गणेशोत्सवासाठी 5 हजार जवान तैनात

Police Force news
Police Force newsesakal

नाशिक : तब्बल दोन वर्षांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला बुधवार (ता. ३१)पासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहर-जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी शहर पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे पाच हजार पोलिस व होमगार्डसच्या जवानांचा फौजफाटा शहर-जिल्ह्यात तैनात राहणार आहे. (5 thousand Police staff deployed for Ganeshotsav Nashik Latest Marathi News)

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांतील सार्वजनिक सण-उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. यंदा मात्र गणेशोत्सवाची शहरभर जय्यत तयारी सुरू आहे. येत्या दहा दिवसांत गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर-ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दोन वर्षांनी सावर्जनिक गणेशोत्सव होत असल्याने गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यादरम्यान कोणतीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उभा राहू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्त, ४० पोलिस निरीक्षक व २२५ सहाय्यक व उपनिरीक्षक पोलिस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त राहील. त्याचप्रमाणे तीन सत्रांत तीन हजार पोलिस अंमलदारांचा फौजफाटा तैनात राहील. अतिरिक्त कुमक म्हणून १५० कर्मचारी असतील. तर एक हजार ५० होमगार्ड जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे क्यूआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्या प्रत्येकी १-१ तुकड्या राहणार आहेत.

Police Force news
Anti Motorcycle Theft पथकाने तडीपार संशयिताकडून केल्या 5 दुचाकी जप्त

ग्रामीण पोलिसांचाही चोख बंदोबस्त

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानुसार बंदोबस्ताची आखणी झाली आहे. अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी बंदोबस्ताबाबत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. दोन पोलिस उपअधीक्षक, सहा पोलिस निरीक्षक, २४ सहाय्यक निरीक्षकांसह २६६ पोलिस अंमलदार, १५० नवप्रविष्ठ अंमलदार राहतील. एक हजार होमगार्डचे जवान राहणार असून, सहा दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्या व दोन एसआरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तात राहतील.

Police Force news
दुचाकी क्रमांकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवीन मालिका; अर्ज करण्याची संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com