नाशिक- सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत प्लँट हेड असताना गैरव्यवहार केल्याने त्यास कामावरून काढून टाकल्यावर संशयिताने कंपनीचे मालक असलेल्या मायलेकींविरोधात खोट्या तक्रारीत त्यांच्याकडून पैसे उकळले. तरीही त्याच्या तक्रारी सुरूच ठेवल्या. अखेर त्याने पोलिस आयुक्तालयाच्या बाहेरच मायलेकींना गाठून कंपनीच्या आवारात आल्यास अत्याचार करण्याची, तसेच खोट्या केस करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवायचे असेल तर ५० लाख द्या, अशी मागणी केली. पीडित मायलेकींनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.