Lasalgaon News : लासलगाव कचरा टाकल्यास पाच हजारांचा दंड

‘घरातील ओला-सुका कचरा रस्त्यावर टाकल्यास पाच हजार रुपयांचा दंड आणि फोटो सोशल मीडियावर टाकला जाईल’
Lasalgaon News
Lasalgaon News Sakal
Updated on

लासलगाव- लासलगाव ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी कठोर पावले उचलत ग्रामस्थांना थेट दंड आणि सार्वजनिक नामोहरम करण्याचा इशारा दिला आहे. बस स्टँडजवळील आर. जे. मॉलकडे जाणाऱ्या मार्गावर लावलेल्या फलकावर ‘घरातील ओला-सुका कचरा रस्त्यावर टाकल्यास पाच हजार रुपयांचा दंड आणि फोटो सोशल मीडियावर टाकला जाईल’ असा इशारा देण्यात आला आहे. या फलकाचा परिणाम त्वरित जाणवत असून, नागरिकांचा हात आखडला आहे. परिणामी, हा परिसर आता स्वच्छ दिसू लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com