येवला- डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने प्रशासकीय संकुल, उपजिल्हा रुग्णालय व तहसील कार्यालय ते फत्ते बुरूज नाका परिसरातील दुतर्फा स्वच्छता अभियान राबवून सुमारे पाच हजार किलो सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छ भारत अभियान राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.