नाशिक- लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत नाशिक विभागात वर्षभरात विविध लोकसेवांसंदर्भात ५० लाख ६८ हजार १३३ अर्ज निश्चित केलेल्या कालमर्यादेत निकाली काढण्यात आले. अर्जांची संख्या पाहता नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिली आहे. येत्या सोमवारी (ता. २८) लोकसेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.