Latest Marathi News | दसऱ्याच्या दिवशी गांधीनगरला 53 फुटी रावण दहन; यंदाचे 67 वे वर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Artists creating a replica of Ravana

दसऱ्याच्या दिवशी गांधीनगरला 53 फुटी रावण दहन; यंदाचे 67 वे वर्ष

नाशिक रोड : गांधीनगर येथील रामलीला मैदानावर दसऱ्याच्या दिवशी बुधवारी (ता. ५) सायंकाळी ५३ फुटी रावणाचे दहन करण्यात येणार आहे. यासाठी रामलीला समितीचे सर्व कलाकार कामाला लागले आहेत. सध्या रावणाची प्रतिकृती तयार केली जात आहे.

दोन वर्ष कोरोना कालखंडानंतर यंदाचा दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. गांधीनगर रामलीला मैदानावर उपनगर येथील कलाकार ५३ फूट रावणाची प्रतिकृती तयार करीत आहेत. विजयादशमीच्या दिवशी जल्लोषपूर्ण वातावरणात रावण दहनाचा कार्यक्रम नाशिक रोड पंचक्रोशीत खास आकर्षण ठरते. (53 feet Ravan Dahan to Gandhinagar on Dussehra day Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: सिंहस्थात 200 CCTV कॅमेरे; साधुग्राम Drone Cameraच्या निगराणीत

रामलीला समितीतर्फे गांधीनगर मैदानावर रामायणातील सर्व पात्रे दाखविले जातात. विजयादशमीच्या सायंकाळी श्रीरामाची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्या घनघोर युद्धाचे प्रसंग सादर केले जातात. रावण दहनाने रामलीलेचा समारोप होतो. यंदा रंगीत तालीम जोरात सुरू आहे.

गांधीनगर येथील गृहरक्षक दल कार्यालयासमोर रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी सुनील मोदियानी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. त्यासाठी साहिल जयस्वाल, रोहित परदेशी, सागर सोनवणे, निर्बंध पवार, विमल सोनवणे परिश्रम घेत आहेत. बांबू, काठ्या, सुतळी, पुठ्ठे, काथ्या, खिळे, दोरी आदी साहित्यांचा वापर करून रावणाची प्रतिकृती तयार केली जात आहे.

"यंदा ५३ फुटी रावण आम्ही तयार करीत असून, रोज बांधणी करीत आहोत. दसऱ्याच्या आधी शेवटचे दोन दिवस मुख्य प्रतिकृती साखर होईल यासाठी उपनगरचे स्थानिक कलाकार कष्ट घेत आहे. दोन वर्षानंतरच्या रावण दहन कार्यक्रम उत्साहात साजरा केला जाणार आहे."

-सुनील मोदीयानी, निर्माता, रावण प्रतिकृती

"दसऱ्याच्या दिवशी मोठ्या उत्साहात रावण दहन केले जाते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम होत असल्यामुळे आमच्यात उत्साह संचारला आहे. यंदा रावणाची प्रतिकृतीची उंची वाढविली आहे. यामुळे नेहमीपेक्षा निर्माण करायला एक दिवस अधिक खर्च होणार आहे."

-मनोहर बोराडे, समन्वयक, दसरा समिती

हेही वाचा: प्रोजेक्‍ट दुर्गा : हिमतीच्‍या जोरावर कर्करोगावर मात