Nashik News: मालेगावमध्ये शंभर रुपयांमध्ये 6 किलो पपई! आवक वाढल्याने भाव झाले कमी

मालेगाव येथील फळबाजारात नागपूरची संत्री, ‘कसमादे’च्या डाळिंबासह इतर फळांची रेलचेल आहे.
Khadki farmers selling papaya on Old Agra Road in the city. In the second photograph, a youth buys papayas near a church.
Khadki farmers selling papaya on Old Agra Road in the city. In the second photograph, a youth buys papayas near a church.esakal

मालेगाव : येथील फळबाजारात नागपूरची संत्री, ‘कसमादे’च्या डाळिंबासह इतर फळांची रेलचेल आहे. सफरचंदाचे भाव सामान्यांच्या आवाक्यात येत आहेत.

मात्र, बाजारात पपईची सर्वाधिक आवक असून आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. शंभर रुपयांमध्ये सहा किलो पपई विकत मिळत आहे. ग्राहकांकडून खरेदीसाठी पसंती मिळत आहे. (6 kg of papaya for one hundred rupees in Malegaon income increased prices decreased Nashik News)

फळबाजारात दररोज सध्या दहा टनांपेक्षा अधिक पपई विक्रीसाठी येत आहे. काही शेतकरी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहनातून पपई विक्री करीत आहेत. पंधरा दिवसांपासून पपईची आवक वाढली आहे.

जवळपास दुप्पटीने आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात २२ रुपये किलोने मिळविणारी पपई सध्या आठ रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौकात पपई विक्रीच्या हातगाड्या दिसत आहेत.

सटाणा नाका, रावळगाव नाका, सोमवार बाजार, चर्च परिसर, एकात्मता चौक, मच्छी बाजार, इक्बाल डाबी, देवीचामाळ, आयशानगर, सलामताबाद, रामसेतू, गूळबाजार, सरदार चौक यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पपई विक्रीची दुकाने लावण्यात आली आहेत.

पन्नासला तीन, तर शंभरला सहा किलो मिळणारी पपई घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

दिल्ली, राजस्थान, पंजाबमधून आवक

दिल्ली, राजस्थान, पंजाबमधून इथे पपई विक्रीसाठी येत आहे. उत्तर भारतातील काही घाऊक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून आठ ते दहा रुपये किलोने पपई खरेदी केली आहे. शेतात पपई काढून पॅकिंग करून ट्रकने माल मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठविला जात आहे.

याशिवाय ‘कसमादे’सह बाभूळवाडी, दहिवड, पिलखोड आदी भागातून पपई विक्रीसाठी येत आहे. ग्रामीण भागात गल्लीमध्ये पपई विक्रेते सायकली व दुचाकीवरून पपईची विक्री करताना दिसत आहेत.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इथे पपईची आवक अशीच राहणार असल्याच्या अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

Khadki farmers selling papaya on Old Agra Road in the city. In the second photograph, a youth buys papayas near a church.
Nashik Political News: भाजपने शिवसेना फोडली : कोंडाजीमामा आव्हाड

उत्पादन खर्च निघणे मुश्‍कील

शहरासह ‘कसमादे’त दरवर्षी एप्रिल-मेमध्ये उन्हाळी टरबुजाचे भाव कोसळतात. भाव नसल्याने अनेक शेतकरी वाहनातून रस्त्याच्या कडेला टरबुजाची विक्री करतात.

यंदा पपईचे उत्पादन वाढले असून भाव कमी झाले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी स्वतः ठिकठिकाणी पपईची विक्री करीत आहेत.

"गेल्या पंधरा दिवसापासून पपईची आवक वाढली आहे. भाव कमी झाल्याने पपई विक्रीच्या हातगाड्या वाढल्या आहेत. स्वस्तात पपई मिळत असल्याने विक्रीत वाढ झाली आहे. आणखी पंधरा दिवस आवक कायम राहाण्याची शक्यता आहे."

- रफीक बागवान, घाऊक व्यापारी (मालेगाव)

"पपईची दीड एकरावर लागवड केली होती. एक हजार पाचशे झाडे लावण्यात आली. त्यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च झाला. कवडीमोल भावाने पपई विक्री करावी लागत असल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे."

- समाधान दुधेकर, शेतकरी (खडकी, ता. मालेगाव)

Khadki farmers selling papaya on Old Agra Road in the city. In the second photograph, a youth buys papayas near a church.
Nashik Winter Business: थंडीमुळे उबदार कपड्यांचा बाजार फुलला; गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com