Latest Crime News | चेन स्नॅचिंगसह घरफोडीत 6 लाखांचा ऐवज लांबविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : चेन स्नॅचिंगसह घरफोडीत 6 लाखांचा ऐवज लांबविला

नाशिक : शहराच्या विविध भागात चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहन चोरी यासारख्या घटना सातत्याने घडत असल्याने नाशिककरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. माजी महापौरांच्या पत्नीला चेन स्नॅचरचा हिसका बसल्यानंतर आता त्र्यंबक रोडवर झालेली चेन स्नॅचिंग तर पुणे मार्गावरील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडी अशा दोन घटनांमध्ये सहा लाख १० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. (6 lakh stolen in burglary with chain snatching Nashik Latest Crime News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Nashik News : वाहनाच्या धडकेत 2 दुचाकीस्वार ठार

सातपूर मार्गावर हॉटेल डेमक्रसी हॉल परिसरात विवाहाला आलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेत एक जण भिंतीवरून उडी मारुन अंधारात पळून गेला. राजश्री रवींद्र बुरकुल (वय ५०, स्वामी कृपा अपार्टमेंट, खोपोली रोड, हनुमान अळी पेण) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या नाशिकला गुरुवारी (ता.९) त्र्यंबक रोड वरील डेमॉक्रसी रिसॉर्ट हॉल येथे विवाहाला आल्या होत्या. विवाहानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास त्या बाहेर पडल्यानंतर पळत आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील ६ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याच्या सोन्याचे वाट्यांची पोत असा साडे तीन लाखांची सुमारे ८ तोळ्याची सोन्याचे दागिने घेऊन कंपाउंड ओलांडून अंधारात पळून गेला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगरमध्ये घरफोडी

नाशिक पुणे महामार्गावर शिवाजीनगर परिसरात सहकार कॉलनीत चोरट्यांनी रात्रीतून घरफोडी करीत घरातील सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला. अरुण राधु आहिरे (रा. सहकार कॉलनी, जनता शाळेजवळ, शिवाजीनगर) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. हॉलमधील कपाटातून अडीच लाखांची रोकड तसेच, सोन्याच्या चार अंगठ्या असा तीन लाख ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून उपनिरीक्षक अतुल पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा: Nashik Weather Update : पारा वाढला अन्‌ थंडी घटली; तापमान 12.6 अंश सेल्‍सीअसवर