Nashik Ganesh Utsav News : पीओपी मूर्ती तपासणीसाठी 6 पथके

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 esakal

Nashik Ganesh Utsav News : केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली असून मूर्तींचा साठा व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सोमवार (ता. २५) पासून पीओपी मूर्ती तपासण्याची मोहीम हाती घेतली जाणार असून त्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा पथके नियुक्त करण्यात आली आहे. (6 teams by nmc for POP idol inspection nashik ganeshotsav news)

श्रीगणेश उत्सवानंतर पीओपी मूर्तीचा साठा आढळल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीओपी मूर्तीचा साठा करणाऱ्यांना महापालिकेने तंबी दिली असून, कृत्रिम तलावात विसर्जनाचे आवाहन केले आहे.

महापालिका हद्दीमध्ये मूर्तिकार तसेच साठवणूकदारांकडे व विक्री करणाऱ्यांकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या उपलब्ध असलेल्या सर्व मूर्तींचे पाचव्या दिवशीच कृत्रिम तलावात विसर्जन करावे.

Ganeshotsav 2023
Nashik Rain News : नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप; गंगापूरमध्ये 97.10 टक्के साठा

तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

पाचव्या दिवशी किती प्रमाणात पीओपी मूर्तींचे दान झाले, याचा आढावा घेण्यात आला. सदर प्रमाण कमी असल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून पीओपी मूर्तीचा साठा असेल तेथे तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथक पाहणी करेल. मूर्ती आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Ganeshotsav 2023
Anant Chaturdashi 2023 : विसर्जन मिरवणूक सकाळी अकरालाच; गणेश मंडळांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com