Rajya Natya Spardha : अंदरसुलच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद प्रयत्न ‘फ्रिडम 75’

Freedom 75 play
Freedom 75 playesakal

नाशिक : येवला तालुक्यातील अंदरसुलसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या तरुण- तरुणींनी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत एखाद्या संवेदनशिल विषयावर रंगमंच गाजवणे हे खरेतर धाडसाचेच. असे असतानाही हे धाडस खरोखरच कौतुकास्पद ठरावे, असे सादरीकरण मंगळवारी (ता. ६) येथे बघावयास मिळाले. ग्रामिण भागातून आलेलो असल्याचे काहीसे दडपण या कलावंतांच्या देहबोलीवरून जाणवत असले, तरी त्यामुळे नाटकाच्या एकूणच सादरीकरणाला त्यामुळे कुठेही धक्का लागणार नाही याचीही पुरेपूर काळजी या तरुण-तरुणींनी घेतली.

नावावरूनच कथानक आणि विषयाची कल्पना यावी, असे प्रासंगिकता टिपणारे ‘फ्रिडम ७५’ हे नाटक नाशिकच्या महात्मा फुले अकादमी संचलित येवला येथील रंगभूमी या संस्थेने सादर केले. अंदरसुल येथील कलावंतांनी रंगमंचावर दाखवलेले धाडस आणि क्षमता मात्र खरोखरच कौतुकास्पद होती. आणीबाणीपासून थेट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत आणि त्यातही कोरोनासारख्या घातक परिस्थितीवरही परखड भाष्य करतानाच भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा मांडणाऱ्या या दोन अंकी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन विक्रम गायकवाड यांचे आहे.

त्यात अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनावणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी शरद पाडवी, प्रांजल खैरनार, मेहेर शेख, अविनाश सोनवणे, स्नेहल सजन, कार्तिक गायकवाड, पियुष शिनगारे, वैभव गायकवाड, संकेत चिकने, यश हाडोळे, समीर गायकवाड, आदित्य देवरे, केदार जानराव, ओंकार सोनवणे, सचिन काळे, अथर्व दाभाडे, आदित्य खैरनार, आदित्य थोरात व शिवानी विभूते यांनी विविध भूमिका साकारल्या. गणेश सोनवणे यांनी रसिका शिंदे यांच्या साहाय्याने सुंदर नेपथ्य उभे केले.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Freedom 75 play
Nashik News: आरोग्यसेवा वाऱ्यावर, शिक्षणाचा बोजवारा; रस्त्याचे विघ्न दूर करण्यासाठी आदिवासींचा आक्रोश

तर प्रकाश योजनेची जबाबदारी आदित्य राहाणे यांनी यशस्वीपणे सांभाळली. संगीत संयोजन अमोल काबरा यांचे तर संगीतसाथ शंकर अहिरे व सुनील गोविंद यांची आणि वेशभूषा सुवर्णा चव्हाण यांची होती. माणिक कानडे यांनी रंगभूषेची जबाबदारी सांभाळली. लेखक श्री. गायकवाड यांनी लिहिलेल्या व प्रसिद्ध संगीतकार संजय गीते यांनी संगीतबद्ध केलेल्या आधुनिक नांदीने होणारी नाटकाची सुरवातदेखील वैशिष्ट्यपूर्ण होती.

आजचे नाटक

दरम्यान, स्पर्धेत बुधवारी (ता. ७) सायंकाळी सातला प्रा. अनिल सोनार लिखित ‘प्रतिकार’ हे नाटक सादर होणार आहे. येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सुजय भालेराव यांनी केले आहे.

Freedom 75 play
Nashik News : पथ विक्रेत्यांकडून बाजार फी वसूल करणार Bouncer!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com