Rajya Natya Spardha : धक्कातंत्रामुळे पकड घेऊनही दुसरा अंक ठरला ‘पथनाट्य’

Scene from play
Scene from playesakal

नाशिक : प्रेम, जातीयवाद आणि समाजवादासारख्या विषयांच्या माध्यमातून सामाजिक विषमतेवर थेट भाष्य करणारे ‘कावळ्याचं घर शेणाचं’ हे नाटक पहिल्या अंकात प्रेक्षणीय ठरले अन् दुसऱ्या अंकात मात्र कलावंतांच्या लवाजम्यामुळे पथनाट्याकडे निघाल्याने जाणकार प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झाला. नाटकाच्या कथानकात वापरलेले धक्कातंत्र आणि ताकदीच्या सादरीकरणामुळे नाटकाचा पहिला अंक प्रभावी ठरला, पण हा प्रभाव अखेरपर्यंत टिकवण्यात दुसरा अंक मात्र कमी पडला. (61st haushi Rajya Natya Spardha kavlyach ghar shenach nashik news)

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयातर्फे सुरू असलेल्या ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रंगकर्मी थिएटर्सने मंगळवारी (ता. २२) अशोक कांबळी लिखित व जयदीप पवार दिग्दर्शित ‘कावळ्याचं घर शेणाचं’ हे दोन अंकी नाटक सादर केले. दमदार कथानकात धक्कातंत्राचा यशस्वी वापर, शिवाय विषयाची मांडणी, वैचारिक पातळीवर उच्च दर्जाचे संवाद आणि जोडीला एकूणच स्पर्धात्मक तांत्रिक बाजूंच्या भक्कमपणामुळे नाटकाचा पहिला अंक उत्कंठावर्धक ठरला.

मुंबई -कसारा लोकल रेल्वेमार्गावरील उंबरमाळी रेल्वेस्थानकाचे पियुष भांबळ यांनी साकारलेले नेपथ्य आणि स्वत: दिग्दर्शक श्री. पवार यांनी चैतन्य गायधनीच्या सहकार्याने सांभाळलेली प्रकाश योजना कथानकाला साजेशी होती. राहुल कानडे यांचे संगीत आणि राहुल कानडे यांचे पार्श्‍वसंगीतदेखील प्रसंगानुरूप पूरक आणि यथायोग्य असेच होते. माणिक कानडे यांची रंगभूषा, कविता देसाई यांची वेशभूषाही चांगल्याच. विशेष म्हणजे अभिनयाच्या अंगाने उभा करावा लागलेला मोठा लवाजमाही या नाटकाची जमेची बाजूच ठरला.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

Scene from play
Nashik Plastic Ban : पंचवटीत प्लॅस्टिक वापरणाऱ्यादुकानदारांना 15 हजाराचा दंड!

त्यात शुभम धांडे, दिनेश पवार, वैष्णवी मेटकर, हर्षल जोशी, आदित्य तांबे, सीमा पाठक यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. तर, सिद्धी बोरसे, राहुल बर्वे, साक्षी बनकर, करण राजपूत, सनी शंखपाळ, अनिकेत महाजन, राहुल पाटील यांच्यासह चिराग चव्हाण, रुद्राक्ष गायकवाड, संस्कृती पवार, आदित्य शिरोडे, हर्ष मांडगे यांनीही पूरक भूमिकांसाठी चांगलीच मेहनत घेतल्याचे जाणवते.

विशेष म्हणजे एवढा मोठा लवाजमा सोबत असतानाही सामाजिक विषमतेसारख्या विषयाला हात घालण्याचे कसब लेखकाईतकेच दिग्दर्शक आणि एकूणच टीमने पहिल्या अंकांपर्यंत यशस्वीपणे पेलले. मात्र, दुसऱ्या अंकात हा लवाजमाच सादरीकरणास घातक ठरला आणि नाटक संपेपर्यंत हे ‘नाटक होते की पथनाट्य’ हेच समजेना, अशी प्रेक्षकांची गत झाली होती.

आजचे नाटक

स्पर्धेत बुधवारी (ता. २३) सायंकाळी तिष्या मुनवर लिखित ‘एशक का परछा’ हे नाटक सादर होणार आहे. नाट्यसेवा थिएटर्सची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक आनंद जाधव आहेत.

Scene from play
CM Shinde Group News : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या ऐक्यात मिठाचा खडा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com