विवाहाच्या आमिषाने महिलेला 62 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

marriage pretext fraud
marriage pretext fraudesakal

नाशिक : लग्न (Wedding) करून तुझ्यासह आईचा सांभाळ करेल, शेअर मार्केट (Share Market) मध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होईल असे आमिष दाखवून एकाने महिलेस सुमारे ६२ लाख रुपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. याप्रकरणी सासवड, पुणे येथील महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित प्रसन्नकुमार नानाजी जगदाळे यांच्याविरुद्ध फसवणुकीची (Cheating) फिर्याद दाखल केली आहे. (62 lakh fraud of woman on pretext of marriage Nashik Crime News)

फिर्यादीनुसार संशयित प्रसन्नकुमार जगदाळे याने ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत गंडा घातला. ओळखीचा गैरफायदा घेत त्यांच्या आईच्या उपचारांची तरतूद होईल, तसेच विवाह करून नवीन फ्लॅटमध्ये आईचा सांभाळ करून राहू, असे आमिष संशयिताने दिले. त्यानंतर संशयिताने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष दाखवून पैसे घेतले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जगदाळे यास तोटा झालेला असतानाही त्याने खोटे सांगून ५० लाख रुपयांचा फायदा झाल्याचे सांगत दिशाभूल केली. गुंतवणूक केल्याचा मोबदला म्हणून महिलेकडून संशयिताने १९ लाख ९७ हजार ६४४ रुपये ब्रोकरेज म्हणून घेतले.

marriage pretext fraud
Nashik : पावसाळ्यापूर्वीच 60 ठिकाणी विशेष नियोजन

त्यानंतर डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संशयिताने ३८ लाख सहा हजार ८५० रुपये घेतले. मात्र, पैसे शेअर मार्केटमध्ये न गुंतवता संशयिताने फ्लॅट घेतला. तो फ्लॅट महिलेच्या नावावर करण्यास संशयिताने नकार दिला. त्याचप्रमाणे संशयिताने इतर कारणे सांगून महिलेकडून चार लाख ४२ हजार रुपये घेतले होते. याप्रकारे संशयिताने सुमारे ६२ लाख ४६ हजार ४९४ रुपये घेत फसवणूक केली. वारंवार मागणी करूनही संशयिताने पैसे न दिल्याने महिलेने सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.

marriage pretext fraud
Nashik : शहरात नाले सफाईला गती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com