...त्या दिवशी नाशिकच्या अग्निशामक विभागात खणाणले सुमारे 63 कॉल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire brigade

...त्या दिवशी अग्निशामक विभागात खणाणले सुमारे 63 कॉल!

नाशिक : अग्निशामक विभागाची (fire brigade) सतत दूरध्वनी खणखणत असतात. कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ होते. अशीच धावपळ तीन दिवसांमध्ये शहरातील विविध अग्निशामक केंद्रावर दिसून आली. पण त्या दिवशी अग्निशामक विभागात चक्क ६३ फोन कॉल्स खणाणले....(63 phone calls at fire brigade)

त्या दिवशी अग्निशामक विभागात चक्क ६३ फोन कॉल्स खणाणले.

शहरात तीन दिवसापासून चक्रीवादळाच्या वातावरणामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यानिमित्ताने अग्निशामक विभागात विविध प्रकारचे सुमारे ६३ कॉल आले. जुने नाशिक, त्र्यंबक सिग्नल, पंचवटी, सिडको अशा विविध भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. इतरही अनेक घटना वादळी वाऱ्यामुळे घडल्याने नागरिकांकडून मदतीसाठी अग्निशामक विभागास कॉल करण्यात आले. त्यात सर्वाधिक वृक्ष कोसळण्याच्या घटनेच्या कॉलचा समावेश आहे. रविवारी (ता.१६) ते बुधवार (ता.१९) या चार दिवसात सुमारे ६३ घटनांमध्ये मदतीसाठी अग्निशमन विभागास कॉल आल्याची माहिती विभागाकडून प्राप्त झाली. यात सर्वाधिक वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्याच्या कॉलचा समावेश आहे. शहरात सुमारे ४३ वृक्ष कोसळून काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अन्य २१ घटनांचे कॉल आल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा: नाशिकमध्ये रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट नंतरच होणार लसीकरण

असे झाले कॉल

अग्निशामन विभाग वृक्ष इतर

शिंगाडा तलाव मुख्यालय १३ १०

सातपूर ०८ ०२

पंचवटी ०६ ०५

सिडको ०६ ०२

नाशिक रोड ०६ ०२

पंचवटी ०४ ००

हेही वाचा: स्थायी समितीकडून अंदाजपत्रकात ४०० कोटींची वाढ

loading image
go to top