नामपूर - एमपीएससी परीक्षेच्या धर्तीवर शिक्षण विभागातर्फे पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा यंदा धक्कादायक निकाल लागला आहे. राज्यातील सुमारे साडेसहा लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर मंथन होण्याची गरज आहे. राज्यात आठवीचे ८१ टक्के तर पाचवीचे ६६ टक्के विद्यार्थी नापास झाल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.