Corona Update : जिल्‍ह्यात 71 पॉझिटिव्‍ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

Corona Update : जिल्‍ह्यात 71 पॉझिटिव्‍ह

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची (Corona patients) संख्या पन्नासहून अधिक राहत आहे. सोमवारी (ता. ४) जिल्‍ह्यातील ७१ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ६६ रुग्‍णांनी कोरोनावर (Corona) यशस्‍वी मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत पाचने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ३८३ झाली आहे. (71 positives in the district Nashik Corona Update News)

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३४, नाशिक ग्रामीण भागातील ३२ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. मालेगाव महापालिका क्षेत्रात एक, तर जिल्ह्याबाहेरील चार रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सध्या उपचार घेत असलेल्‍या ३८३ बाधितांपैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील २२१, नाशिक ग्रामीणमधील १३७, मालेगावचे आठ, तर जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्या बाधितांपैकी ५२ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

हेही वाचा: शिवसेनेसाठी मुस्लीम दाम्पत्याचे तुळजाभवानी सह अजमेर दर्ग्याला साकडे

प्रलंबित अहवालांची संख्या एक हजार दोनवर पोचली आहे. सर्वाधिक ८७२ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण भागातील आहेत, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील ७९, मालेगावच्‍या ५१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. सोमवारी जिल्‍ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ४.९४ टक्‍के राहिला. नाशिक महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्‍हिटी दर ६.८१ टक्‍के राहिला.

हेही वाचा: Nashik : बॅरिकेटस ठरताय चालकांसाठी डोकेदुखी

Web Title: 71 Positives In The District Nashik Corona Update News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top