कळवण- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या, सप्तशृंगगडावर होणारी अद्ययावत पोलिस चौकी, विश्रामगृह, कर्मचारी वसतिगृह बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सात कोटी १५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून, कामाला सुरुवात करण्यात येईल. यामुळे कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटणार असून, पोलिस यंत्रणेसाठी सुखद वार्ता आहे.