सद्‌गुरुंच्या संदेशाने भाविकांची चेतना प्रकाशमान

सद्‌गुरुंच्या संदेशाने भाविकांची चेतना प्रकाशमान
Published on: 
पान दोन सेकंड मेन ------------ 33909 ---------- 33911 समालखा : ७९ व्या निरंकारी संत समागमात उपस्थित भाविक. प्रत्येक परिस्थितीत अढळ राहणारी भक्ती हीच खरी भक्ती सदगुरू माता सुदिक्षाजी : ७९ व्या निरंकारी संत समागमात भाविकांचा महासागर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : प्रत्येक परिस्थितीत परमात्म्याच्या प्रेमात स्थिर राहणे हीच खरी जागृती आहे . आत्म्याचे परमात्म्याशी मिलन आणि प्रत्येक क्षणी निराकार प्रभूचा अनुभव घेणे हाच आध्यात्मिक जीवनाचा सार आहे. परमात्मा अटल सत्य आहे. मात्र आपल्या इच्छा आणि परिस्थिती सतत बदलत असतात. अनुकूल परिस्थितीत श्रद्धा कायम ठेवणे सोपे असते; परंतु प्रत्येक परिस्थितीत अढळ राहणारी भक्ती हीच खरी भक्ती असल्याचे प्रतिपादन सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांनी केले . ७९ व्या वार्षिक निरंकारी संत समागमात समालखाच्या (पानीपत, हरियाणा) पावन भूमीवर देश-विदेशातून सहभागी झालेल्या लाखो श्रद्धाळूंच्या उपस्थितीने प्रेम, श्रद्धा आणि एकत्वाचे अनुपम दृश्य साकारले. गुरु आणि गुरसिख यांचा हा पावन मिलाप प्रेम, मानवता आणि विश्वबंधुत्वाची भावना साकार करताना दिसून आला. तर समागममध्ये नाशिकच्या निरंकारी बंधू भगिनींची सेवा अविरतपणे चालू होती. जीवनात ज्या ठिकाणी परिवर्तन शक्य आहे, तेथे सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्या परिस्थितीत परिवर्तन शक्य नाही, त्या परिस्थितीचा सहजतेने स्वीकार करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. असा सल्ला माता सुदिक्षाजी यांनी भाविकांना दिला. समागमामध्ये मिशनच्या आरोग्य व समाजकल्याण विभागाच्या वतीने व्यापक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विविध क्षेत्रांतील वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने श्रद्धाळूंना व्यापक आणि अचूक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. समागम परिसरात चार ठिकाणी सामुदायिक भोजन अर्थात लंगर व्यवस्था करण्यात आली होती. लाखो भाविकांना दिवसरात्र भोजन उपलब्ध करून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com