किसान रेल्वेच्या ८०० फेऱ्या पूर्ण

मध्य रेल्वेने २.७५ लाख टन फळे, भाजीपाल्याची वाहतूक
किसान रेल्वेच्या ८०० फेऱ्या पूर्ण

मनमाड : जलद वाहतूक, ५० टक्के अनुदानासह शेतमालासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्‍चित करून किसान रेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धी, आनंद आणि आशा घेऊन आली आहे. पहिली किसान रेल सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या ८०० फेऱ्यांमधून आतापर्यंत दोन लाख ७५ हजार ७६१ टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे.

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेने आपल्या ८०० व्या फेरीत २०७ टन फळे, भाजीपाला जसे की पपई, डाळिंब, केळी, भारतीय मनुका, आले, कांदा सांगोला, दौंड आणि मनमाड येथून बिहार राज्यातील दानापूर, मुझफ्फरपूर येथे नेले. मध्य रेल्वेने २८ नोव्हेंबर रोजी सांगोला ते मुझफ्फरपूर ही ८०० वी किसान रेल चालवली. ७ ऑगस्ट २०२० रोजी पहिली किसान रेल आणि २८ डिसेंबर २०२० रोजी किसान रेलची १०० वी फेरी चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. किसान रेलची ५०० वी फेरी १२ ऑगस्ट २०२१ रोजी चालली. आता किसान रेलची ८०० वी फेरी २८ नोव्हेंबर रोजी सांगोला ते मुझफ्फरपूर करण्यात आली.

सोलापूर विभागातील डाळिंब, द्राक्षे, लिंबू, सिमला मिरची, कस्तुरी खरबूज, पेरू, सिताफळ, भारतीय मनुका, लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, अहमदनगर आणि नाशिक विभागातील कांदा, सोलापूर जिल्ह्यातील तसेच, भुसावळ आणि जळगाव विभागातील केळी, नागपूर विभागातून संत्री आणि इतर फळे व भाजीपाला दिल्ली, बिहार, पश्‍चिम बंगालसारख्या दूरच्या बाजारपेठेत जलद आणि ताजे राहतील, अशा पद्धतीने किसान रेलद्वारे पाठविले गेले. त्यामुळे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. जलद वाहतुकीमुळे वेळ वाचला. माल खराब न झाल्याने मोठ्या बाजारपेठांसह चांगला भाव मिळून शेतकरी समाधानी झाले.

किसान रेल्वेच्या ८०० फेऱ्या जलद, सुरक्षित वाहतूक आणि नवीन मोठ्या बाजारपेठांमधील प्रवेशासह शेतकऱ्यांना त्याचे प्रचंड फायदे स्पष्ट करतात. मध्य रेल्वे सध्या ७ किसान रेल चालवते. देवळाली - मुझफ्फरपूर, सांगोला - मुझफ्फरपूर, सांगोला - आदर्श नगर दिल्ली, सांगोला - शालीमार, रावेर - आदर्श नगर दिल्ली, सावदा - आदर्श नगर, दिल्ली आणि गोधनी - आदर्श नगर - दिल्ली तसेच, या किसान रेल व्यतिरिक्त अनेक अनशेड्यूल किसान रेल चालविल्या जातात.

- अनिलकुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com