Nashik ZP News : आश्वासित प्रगती योजनेचा 81 कर्मचाऱ्यांना लाभ

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal

नाशिक : जिल्हा परिषद वित्त विभाग व महिला बालकल्याण कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १०-२०-३० वर्ष सेवेचा लाभ देण्यात आला. यामध्ये वित्त विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा, वरिष्ठ सहाय्यक लेखा, सहाय्यक लेखाधिकारी अशा १७, तर महिला व बालकल्याण विभागातील ६४ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना या योजनेचा लाभ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मंजूर केला आहे. (81 zp employees benefited from Ashwasit Pragati Yojana Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ZP Nashik latest marathi news
Health Care : वेळीच ओळखा मानसिक थकवा! बदलत्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम

२ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार ७ व्या वेतन आयोगानुसार लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १० वर्ष २० वर्ष व ३० वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येतात. जिल्हा परिषदेतील वित्त विभाग व महिला व बालकल्याण विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर सादर करण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन संगणक अहंता, सेवाप्रवेश परीक्षा उत्तीर्ण, स्थायित्व प्रमाणपत्र, विभागीय चौकशी, मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल यांची पडताळणी करून वित्त विभागातील १७, तर महिला व बालकल्याण विभागातील प्रस्ताव वैध ठरवण्यात आले.

विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेण्यात येऊन वित्त विभाग आणि महिला व बालकल्याण विभागातील एकूण ८१ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला. प्रक्रियेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य लेखाधिकारी स्वरांजली पिंगळे, लेखाधिकारी रमेश जोंधळे, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, रवींद्र आंधळे, संजय सोनवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र देसाई, गणेश बगड, नंदा रायते, कनिष्ठ लेखाधिकारी अजय कस्तुरे, नितीन पाटील, प्रज्ञा धिवरे, वरिष्ठ सहायक किरण कळोगे यांनी मेहनत घेतली.

ZP Nashik latest marathi news
Winter Shopping : थंडी वाढल्याने उबदार कपड्यांची बाजारपेठ तेजीत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com