
कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वयोवृद्धांना याची बाधा झाली, तर ती व्यक्ती जगणे नाहीच, असा काहीसा अपप्रचार आहे. पण, या भीतीवर मात केली ती ८६ वर्षीय निमगाव मढ (ता. येवला) येथील पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी लभडे यांनी.
चिचोंडी (जि. नाशिक) : कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वयोवृद्धांना याची बाधा झाली, तर ती व्यक्ती जगणे नाहीच, असा काहीसा अपप्रचार आहे. पण, या भीतीवर मात केली ती ८६ वर्षीय निमगाव मढ (ता. येवला) येथील पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी लभडे यांनी. कोरोनाला हरवत आठ दिवसांत ते घरी परतले. (86 year old grandfather overcame corona in eight days)
लभडे यांच्या घरात सून व नातू कोरोनाबाधित असल्याने त्यांना कोरडा खोकला होता. रवंदा (ता. कोपरगाव) येथील डॉ. दिलीप दवंगे, डॉ. झवर यांनी त्यांना कोविड चाचणी करण्याचे सांगितले. आधीच रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने लभडे यांच्या जिवाला धोका होता. एचआरसीटी स्कोर १२, तर ऑक्सिजन लेव्हल ७० ते ८० असल्याने मुलगा संतोष व सर्जेराव यांनी त्यांना त्वरित येवल्यातील डॉ. शरद गायकवाड यांच्या रुग्णालयात आणले. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने डॉ. गायकवाड यांनी रुग्णाबाबत व संभाव्य धोक्याबाबत नातेवाइकांना पूर्ण कल्पना दिली. मात्र, केवळ आठ दिवसांतच कोविडसारख्या आजारातून पूर्ण बरे होत आजोबा घरी परतले. आजोबांनी इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात करत भीतीच्या छायेखाली असणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या यशस्वी उपचारामुळे अवघ्या आठ दिवसांत कारभारी लभडे यांनी कोरोनावर मात केली. डिस्चार्ज देताना डॉ. शरद गायकवाड व राजश्री गायकवाड यांनी लभडे यांचा सत्कार केला.
कोरोना हा सर्वसाधारण आजार आहे, हे मी गेल्या वर्षापासून मानत आलो. मला कधी झालाच, तर मी त्याला नक्की हारवणार, असे माझ्या मनात होते. मुलं, सुना, नातू माझी काळजी घेत असल्याने मोठा आधार होता.
- कारभारी लभडे, निमगाव मढ, ता. येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.