Nashik Crime: शिंगाडा तलाव दंगलप्रकरणी 9 संशयितांना कोठडी; 27 दंगलखोरांची पोलिसांकडून शोध मोहीम

Arrest
Arrestesakal

Nashik Crime : शिंगाडा तलाव येथे जुन्या वादाच्या कुरापतीतून दोन गटामध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी ३६ दंगलखोरांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ९ दंगलखोरांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना येत्या मंगळवारपर्यंत (ता. ११) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार झालेल्या २८ दंगलखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. (9 suspects in Shingada lake riot case Search operation by police for 27 rioters Nashik Crime)

शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोरील शिवमुद्रा कार डेकोर येथे कार डेकॉरचे मालक व कामगारांमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून शुक्रवारी (ता. ७) दुपारी दोन गटात हाणामारी झाली.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात दोन्ही गटाविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी नऊ दंगलखोरांना शुक्रवारी (ता. ७) रात्री अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या दंगलखोरांना शनिवारी (ता. ८) जिल्हा न्यायालयात हजर केले असता येत्या मंगळवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, या दंगलीत राहुल राऊत, कौशल वखारकर, विनोद थोरात हे जखमी आहेत.

या दंगलीत राहुल राऊत, मनोज राऊत, उमेश राऊत, प्रभाकर कार डेकॉरचे मालक प्रविण, विनोद थोरात, कौशल वाखारकर, तुकाराम राठोड, चावी बनविणारा अहमद, नाजीम पिरजादे, अन्वर शेख, अज्जू मामू उर्फ अजहर, परवेज निसार शेख, मोबीन,

जैनुल आबेदीन सलाउददीन मौलवी, आरबाज, दानिश, शोएब, फरहान, शाहरूख, प्रेम, अश्पाक व अन्य १५ अनोळखी दंगलखोरांची नावे पोलीस तपासात समोर आलेली आहे. दंगलखोरांनी हातात तलवारी,

कोयते व बांबुसारखे हत्यार घेऊन दगडफेक व शिवीगाळ करून एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देत एकमेकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे सार्वजनिक शांतता भंग करुन पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी व हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Arrest
Pune Crime News : पुणे हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या

पसार दंगलखोरांचा शोध

याप्रकरणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, डॉ. सीताराम कोल्हे, सचिन बारी यांच्यासह गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, मुंबई नाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की,

सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तात्काळ घटनेवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. याप्रकरणात फरार झालेल्या दंगलखोरांना शोधण्यासाठी पोलीसांची विविध पथके त्यांचा शोध घेत आहेत.

Arrest
Dhule Crime News : धुळे हादरले! हातमजूर विवाहितेवर सामूहिक अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com