नाशिक रोड- शिवसेना, युवासेनेतर्फे जिल्ह्यात सलग सहाव्यांदा मोफत सीईटी महासराव परिक्षा युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे यांच्या नियोजनाखाली झाल्या. हा सराव पेपर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता. याकरिता जिल्ह्यातील देवळाली, सिन्नर व इगतपुरी या तीन तालुक्यातील सहा सेंटरवर परिक्षा झाली. देवळालीत ४३८, सिन्नर ३७८, इगतपुरी १२० असे एकूण ९२६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.