Water Crisis : राज्यात 104 गावे अन् 272 वाड्यांसाठी 94 टँकर! गेल्या वर्षीपेक्षा 16 गावे घटली

representative Image
representative Imageesakal

Water Crisis : राज्यात गेल्या आठवड्यापर्यंत १०४ गावे आणि २७२ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ९४ टँकर धावताहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेली टंचाईग्रस्त गावांमध्ये १६ ने घट झाली असली, तरीही ८२ वाड्या वाढल्याने प्रशासनाला ३६ टँकरची वाढ करावी लागली आहे.

गेल्या वर्षी १८ एप्रिलला १२० गावे आणि १९० वाड्यांसाठी ५८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. (94 tankers for 104 villages and 272 mansions in state 16 villages decreased from last year nashik news)

कोकणवासीयांच्या घशा‍ला दिवसेंदिवस कोरड वाढत चालली आहे. कोकणामध्ये गेल्या वर्षी १०० गावे आणि १८१ वाड्यांसाठी ३८ टँकर सुरू होते. गेल्या आठवड्यात कोकणातील ९३ गावे आणि २६६ वाड्यांसाठी ७८ टँकर सुरू करण्यात आले होते.

त्यात ठाणे जिल्ह्यातील ४० गावे आणि १३७ वाड्यांसाठीच्या ३०, रायगडमधील २२ गावे आणि ५२ वाड्यांसाठी १८, पालघरमधील १५ गावे आणि ५२ वाड्यांसाठी २५ टँकरचा समावेश होता. गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्याला ठाण्यात एकही टँकर सुरू नव्हता.

तसेच रायगडमध्ये १२, पालघरमध्ये २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही टँकर सुरू झालेला नाही. याशिवाय औरंगाबाद आणि नागपूर विभागात एकही टँकर सुरू नव्हता. गेल्या वर्षी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एका गावासाठी एक टँकर सुरू होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

representative Image
Ramzan Eid : धार्मिक, पर्यटन स्थळांना भेटीद्वारे ‘बासी ईद’ साजरी; मुस्लिम बांधवांत अमाप उत्साह

जिल्हानिहाय टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्हानिहाय गेल्या आठवड्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अशी ः (कंसात पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या टँकरची संख्या दर्शवते) : जळगाव- २-० (२), नगर- १-५ (२). सातारा- ०-१ (४). अमरावती- २-० (२), बुलढाणा- ६-० (६). गेल्यावर्षी जळगाव आणि नगर जिल्ह्यासाठी १२, अमरावतीसाठी चार, बुलढाण्यासाठी तीन टँकर सुरू होते.

सद्यःस्थितीत नाशिक जिल्ह्यातील २५ गावे आणि नऊ वाड्यांसाठी १७ टँकर सुरू आहेत. येवला, चांदवड, बागलाण तालुक्यांचा त्यात समावेश आहे. उन्हाची धग वाढत आहे, तशी विहिरींची पातळी खालावत असल्याने या आठवड्यात राज्यातील विविध भागांत टंचाईची भीषणता वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात उन्हाळी पिकांची ९६ टक्के पेरणी

० उन्हाळ हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र- तीन लाख ४९ हजार ७५९ हेक्टर

० गेल्या वर्षीची पेरणी- तीन लाख सहा हजार ७७० हेक्टर

० यंदाची पेरणी- तीनन लाख ३६ हजार ६३६ हेक्टर (९६ टक्के)

० तृणधान्य- एक लाख ९९ हजार ९२५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र अन् प्रत्यक्ष पेरणी दोन लाख ४९ हजार ८२ हेक्टरवर

० कडधान्य- २६ हजार ३०९ हेक्टरपैकी आठ हजार ५९२ हेक्टरवर पेरणी

० गळीत धान्य- एक लाख २३ हजार ५२६ हेक्टरपैकी ७८ हजार ९६२ हेक्टरवर पेरणी

० विभागनिहाय पेरणी टक्केवारी : कोकण- ४९, नाशिक- ६६, नागपूर- १९९, पुणे- १२१, कोल्हापूर- ७५, औरंगाबाद- ५७, लातूर- ४४, अमरावती- ६२

० गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती विभागात उन्हाळ हंगामाची पेरणी कमी

० नाशिक विभागातील ६४ हजार ५२ हेक्टरपैकी ४२ हजार ३८० हेक्टरवर आता आणि गेल्या वर्षी ४२ हजार ११९ हेक्टरवर पेरणी

० नाशिक विभागातील आताची पेरणी टक्केवारी अशी : नाशिक- १२१, धुळे- १०४, नंदुरबार- ७९, जळगाव- ५६

representative Image
Dhule News : धुळे-मुंबई एक्स्प्रेस लवकरच धावणार : खासदार डॉ. भामरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com