Nashik News: केंद्रप्रमुख पदोन्नतीचा मार्ग अखेर खुला; जिल्ह्यात 95 शिक्षक होणार केंद्रप्रमुख

जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पैकी ९३ पदे रिक्त होती. ती रिक्त पदे भरण्याची मागणी शिक्षकांची होती.
teacher Recruitment
teacher Recruitmentesakal

Nashik News: जिल्हा परिषदेतील पदवीधर असलेल्या प्राथमिक विभागाच्या पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नतीला विविध शिक्षक संघटनांनी खो घातल्याने रखडलेल्या पदोन्नत्यांचा मार्ग अखेर खुला झाला आहे.

जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना व आक्षेप घेतलेल्या शिक्षकांची बैठक घेऊन यात तोडगा काढण्यात आला. त्यामुळे तालुकानिहाय केंद्रप्रमुख म्हणून ९५ शिक्षकांची पदोन्नती होणार आहे. (95 teachers will be head of center in district nashik news)

जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पैकी ९३ पदे रिक्त होती. ती रिक्त पदे भरण्याची मागणी शिक्षकांची होती. आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही या रिक्त पदांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

त्यानंतर प्राथमिक विभागाने ही प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. परंतु, पदोन्नती प्रक्रियेतील निकषाबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतले. त्यामुळे ही प्रक्रिया चार महिन्यांपासून रेंगाळली. शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीरपणे पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यामुळे त्या निर्णयाविरोधात न्यायालयात शिक्षकांकडून याचिकाही दाखल झालेली आहे. यातच विविध शिक्षक संघटनांनीही वेगवेगळे आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे पदोन्नत्यांबाबत तिढा निर्माण झाला होता. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले.

teacher Recruitment
Teacher Bharti: उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे; शिक्षण आयुक्तांकडून हिरवा कंदील

पदोन्नत्या देण्याबाबत तोडगा काढण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संघटना प्रतिनिधी, आक्षेप घेतलेल्या शिक्षक यांची एकत्रित बैठक घेतली.

यात प्रशिक्षित पदवीधर यांचे वेतनश्रेणी व पदवीधर शिक्षक सेवाज्येष्ठतानुसार या पदोन्नत्या करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. त्यासाठी तालुकास्तरावरून यादी मागविली असून, त्यानंतर लागलीच ही अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

२६ व २७ डिसेंबरपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. हरकतींवर सुनावणी घेऊन पुढील वर्षात ही पदोन्नती प्रक्रिया राबविली जाईल. त्यात साधारण ९५ शिक्षक व केंद्रप्रमुखांना पदोन्नत्या मिळतील, असे शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी सांगितले.

teacher Recruitment
Teacher Bharti Portal: शिक्षक भरतीसाठी 15 दिवसांत सुरू होणार पोर्टल; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com